उंदीर मारण्याचे औषध सेवन करणाऱ्या खेळाडूंकडून हिसकावले पदक
By admin | Published: August 19, 2016 11:01 PM2016-08-19T23:01:12+5:302016-08-19T23:01:12+5:30
रिओ आॅलिम्पिकमधील कास्यपदक विजेता वेटलिफ्टर किर्गिस्तानच्या इज्जत अतिर्कोव्हला डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याचे पदक हिसकावून घेण्यात आले.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १९ : रिओ आॅलिम्पिकमधील कास्यपदक विजेता वेटलिफ्टर किर्गिस्तानच्या इज्जत अतिर्कोव्हला डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याचे पदक हिसकावून घेण्यात आले.
२२ वर्षीय इज्जतने ६९ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले होते. स्ट्रीशनाईन हा पदार्थ तयार करण्यासाठी उंदीर मारण्याच्या औषधाचा उपयोग होतो आणि हा पदार्थ सेवन करण्यासंबंधी इज्जत दोषी आढळला. कीटकनाशके मारण्यासाठी या पदार्थाचा उपयोग केला जातो आणि विश्व डोपिंगविरोधी एजन्सी (वाडा)ने त्यावर बंदी लादली आहे.
१९ व्या आणि २0 व्या शतकात खेळाडू आपली कामगिरी उंचावण्यासाठी स्ट्रीशाइनचा जास्त उपयोग करीत होते. १९0४ च्या सेंट लुईस आॅलिम्पिकमध्ये थॉमस हिक्सने मॅरेथॉन जिंकल्यानंतर याच पदार्थाचे धन्यवाद मानले होते. वृत्तानुसार टूर डी फ्रान्सवेळेसही सायकटपटू या पदार्थाचा जास्त उपयोग करीत.