भारतीय टेनिसपटूंचा कसून सराव

By admin | Published: January 31, 2017 04:32 AM2017-01-31T04:32:18+5:302017-01-31T04:32:18+5:30

भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस, युकी भांबरी, साकेत मायनेनी यांच्यासह न्यूझीलंड संघातील खेळाडूंनी सोमवारी भारत-न्युझीलंड आशिया/ओशानिया ग्रुप गट

Tight practice of Indian tennis players | भारतीय टेनिसपटूंचा कसून सराव

भारतीय टेनिसपटूंचा कसून सराव

Next

पुणे : भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस, युकी भांबरी, साकेत मायनेनी यांच्यासह न्यूझीलंड संघातील खेळाडूंनी सोमवारी भारत-न्युझीलंड आशिया/ओशानिया ग्रुप गट १ साखळी लढतीसाठी कसून सराव केला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथिल टेनिस कोर्टवर होणाऱ्या या एतिहासिक लढतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून दोन्ही संघ वेगवेगळ्या वेळी दुपारनंतर शहरात दाखल झाले.येत्या ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती संकुल बालेवाडी येथे तब्बल ४३ वर्षांनी ही लढत रंगणार आहे. भारताचे कर्णधार आनंद अमृतराज म्हणाले की येथील कोर्टचा आणि वातावरणाच अंदाज घेण्यासाठीच हे सराव सत्र होेते.
भारतीत संघातील अन्य खेळाडूंपैकी युकी भंब्रीने प्रशिक्षक झीशान अली यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. तसेच, गुणवान युवा खेळाडू साकेत मायनेनी(एकेरी मानांकन १९९), आणि २६८ मानांकित रामकुमार रामनाथन यांनीही राखीव खेळाडू प्रज्ञेश गुन्नेश्वररणच्या साथीत सराव केला. याचबरोबर नितीन कुमार सिन्हा आणि आदिलकल्याणपुर या कुमार खेळाडूंनी त्यांना साथ दिली. या खेळाडूंना पुण्यांतील परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता काही काळ लागणार असल्याचे झीशान अली यांनी सांगितले. लिएंडर पेसने सोमवारी सकाळी सराव केला आणि इतर खेळाडूंनी दुपारच्या सत्रात त्याला साथ दिली. देशासाठी डेव्हिस चषक खेळणे हा सन्मान असून या लढतीसाठी उत्सुक असल्याचे पेसने सांगितले. तसेच, आपल्या कारकिदीर्तील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे तो म्हणाला.
या लढतीत दुहेरीचा विश्वविक्रम करण्याची पेसला संधी आहे. त्याच्याविरूध्द न्युझीलंडचा आर्टेम सिटॅक हा खेळाडू आव्हानवीर असेल. पेस - सिटॅक यांच्यातील लढत टेनिस शौकिनांसाठी मेजवानी ठरेल. मार्कस डॅनइलच्या जागी सिटॅकचा समावेश करण्यात आला आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Tight practice of Indian tennis players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.