मातीचं घर, लाईट-पाणी नाही; MS Dhoniच्या राज्यातील आशाची राष्ट्रकुल स्पर्धेत 'रौप्य'क्रांती!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:52 PM2023-08-11T12:52:34+5:302023-08-11T12:53:21+5:30
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खूप मोठं नाव... झारखंड राज्यातील रांची येथील एक सामान्य कुटुंबातील 'माही' भारतीय क्रिकेटचा स्टार बनला...
महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खूप मोठं नाव... झारखंड राज्यातील रांची येथील एक सामान्य कुटुंबातील 'माही' भारतीय क्रिकेटचा स्टार बनला... आयसीसीच्या तीन प्रमुख ( ट्वेंटी-२०वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ) स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कॅप्टन कूलची संपती ७००-८०० कोटींच्या घरात आहे. पण, हे आज सांगण्याचं कारण की... त्रिनबागो येथे सुरू असलेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत धोनीच्या राज्यातील कन्येने रौप्यक्रांती केली आहे. त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडली अन् त्यात भारताच्या आशाकिरण बार्लाने ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले.
A good day for us at the Commonwealth Youth Games. Congratulations to Barla Asha Kiran for winning the 🥈 in the Women’s 800m run, Pooja for her 🥉 in the Women’s High Jump event, and Arjun on winning the 🥉 in the Javelin Throw event 👏🏽👏🏽 pic.twitter.com/txGIyfcz2Y
— Team India (@WeAreTeamIndia) August 11, 2023
आशाने महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत २:०४.९९ सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक जिंकले. इंग्लंडची गिल फोएबे ( २:०२.३० सेकंद) आणि ऑस्ट्रेलियाची कूपर फ्लूर ( २:०५.८६ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले. रांचीपासून १०० किलोमीटर दूर असलेल्या गुलमा या आदिवासी जिल्ह्यातला आशाचा जन्म... मातीच्या घरात लहानाची मोठी ती झाली. ज्या घरात लाईट नाही, पिण्याचं पाणी येत नाही. अशा कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या आशाने आज युवा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ऐतिहासिक रौप्यपदक जिंकून दिले.
आशाने जेव्हा भोपाळमध्ये पार पडलेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावले होते, तेव्हा तिला हा आनंद आपल्या आईला सांगायचा होता. पण, तिला दोन दिवस वाट पाहावी लागली. तिचा जिल्हा हा नक्षलग्रस्त आहे. तिच्या पदक जिंकल्याची बातमी आईला शेजाऱ्यांकडून समजली. त्यांच्याच फोनवरून आईने तिला कॉल केला. आशा बोकारो येथील आशू भाटीया यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेते.