ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मध्ये आतापर्यंत भारताची सरशी
By admin | Published: March 27, 2016 04:48 PM2016-03-27T16:48:51+5:302016-03-27T16:54:16+5:30
ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट, रोहीतने नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारताला सर्वाधिक धोका डेव्हीड वॉर्नरचा असेल. गोलंदाजाची दिशा आणि लय बिघडवण्याची क्षमता या डावखु-या फलंदाजामध्ये आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २७ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये महत्वाचा सामना होत आहे. हा सामना म्हणजे एक प्रकारे क्वार्टर फायनल आहे. कारण विजेता संघ उपांत्यफेरीत तर, पराभूत संघ स्पर्धेतून गाशा गुंडाळणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट, रोहीतने नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारताला सर्वाधिक धोका डेव्हीड वॉर्नरचा असेल. गोलंदाजाची दिशा आणि लय बिघडवण्याची क्षमता या डावखु-या फलंदाजामध्ये आहे.
टी-२०मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया रेकॉर्ड भारतीय चाहत्यांना दिलासा देणारा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत टी-२०चे बारा सामने खेळले गेले असून, भारताने आठ तर, ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत.
टी-२० मधील तिघांच्या आकडेवारीवर नजर टाकूया.
टी-२० मधील विराटच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याने ४१ सामन्यात १३१.७२ च्या स्ट्राईक रेटने १४७० धावा केल्या आहेत. ९० ही त्याची टी-२०मधील सर्वोत्तम खेळी आहे.
टी-२० मध्ये रोहितच्या नावावर एक शतक जमा आहे. त्याने ५८ सामन्यात १२७.५२ च्या स्ट्राईक रेटने १२३७ धावा केल्या आहेत. १०६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ६० सामन्यात १४०.३७ च्या स्ट्रईक रेटने १६२७ धावा केल्या आहेत. त्याचीही ९० सर्वोत्तम धावसंख्या आहे.