तिलकरत्ने दिलशान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणार निवृत्ती
By Admin | Published: August 25, 2016 04:53 PM2016-08-25T16:53:02+5:302016-08-25T16:53:32+5:30
श्रीलंकेचा क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान ऑस्ट्रेलियाच्या दौ-यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २५ - श्रीलंकेचा क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान ऑस्ट्रेलियाच्या दौ-यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दमबुल्ला येथे होणारी एकदिवशीय मालिकेतील तिस-या सामन्यानंतर आणि दोन टी-२० सामने खेळल्यानंतर पूर्णपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, असे तिलकरत्ने दिलशान याने येथील स्थानिक मिडीयाशी बोलताना सांगितले.
श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पाच सामन्यानंतर आणि ६ सप्टेंबर व ९ सप्टेंबरला होणा-या टी-२० सामन्यानंतर निवृत्ती घेण्याचा तिलकरत्ने दिलशान निर्णय घेतला आहे.
39 वर्षीय तिलकरत्ने दिलशानने आत्तापर्यंत ८७ कसोटी सामने खेळले असून यामध्ये ५४९२ धावा आणि ३९ विकेट्स घेतले आहेत. तर ३२८ एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये १०, २३८ धावा आणि १०६ विकेट्स घेतले आहेत.