जेतेपदाची वेळ जवळ आली !
By admin | Published: April 12, 2016 03:37 AM2016-04-12T03:37:16+5:302016-04-12T03:37:16+5:30
आयपीएलचे नववे सत्र सुरू झाले. आमच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला यंदा जेतेपदाचा विश्वास वाटतो. संघ संतुलित आहे आणि सांघिक कामगिरीच्या बळावर प्रत्येक सामना जिंकू शकतो.
- एबी डिव्हिलियर्स लिहितो़...
आयपीएलचे नववे सत्र सुरू झाले. आमच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला यंदा जेतेपदाचा विश्वास वाटतो. संघ संतुलित आहे आणि सांघिक कामगिरीच्या बळावर प्रत्येक सामना जिंकू शकतो. आमच्या संघात प्रतिभेची उणीव नाही.
२००९ आणि २०११ चा उपविजेता
संघ या नात्याने एक पाऊल पुढे टाकून यंदा जेतेपदाची माळ गळ्यात घालायची आहे.
शेन वॉट्सन, स्टुअर्ट बिन्नी, सॅम्युअल बद्री असे नवे चेहरे संघात आले. यामुळे आत्मविश्वासही उंचावला. खेळाडू आणि कोचिंग स्टाफ फारच आनंदी आहे. मागच्या सत्रात लौकिकास्पद कामगिरी झाली नाही, याची खंत आहेच; पण यंदा जेतेपदावर झेप घेण्याची वेळ आली, ही जाणीव राखूनच खेळणार. फलंदाजी आणि गोलंदाजीत आम्ही नंबर वन आहोत. वॉट्सन व बिन्नी हे सर्वोत्कृष्ट आॅलराउंडर आमच्या संघात आहेत, हे विशेष.
जेतेपदासाठी मात्र एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष द्यावे लागेल, हे ध्यानात आहे. सामन्यागणिक आव्हानांचा सामना करू. आमच्या संघातील समन्वय पाहता कुठल्याही संघाला धूळ चारण्याइतपत
तयारी झाली आहे. मला आमच्या संघाचे नवे टी-शर्ट फारच आवडले. संघाच्या टी-शर्टमध्ये निळ्याऐवजी काळा रंग यंदा वापरण्यात आला. माझे डोळे मात्र सध्या विश्व क्रिकेटमधील रोमहर्षक स्पर्धेकडे लागले आहेत, हे विशेष.
बंगळुरू शहर मला मनापासून आवडते. मागच्या वर्षी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर १०० वा सामना माझ्या पसंतीच्या शहरात खेळलो, हेदेखील विशेष. मला येथे घरच्यासारखे वाटते. आयपीएल खेळताना तर मला अधिकच मजा येते. यंदा माझा मुलगा ज्युनिअर एबी, तसेच पत्नी डॅनिली सोबत आली आहे.
(टीएमसी)