कंटाळा आणि तोही एक्सरसाइजचा?
By admin | Published: May 12, 2017 06:32 PM2017-05-12T18:32:04+5:302017-05-12T18:32:04+5:30
- येणारच. कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं घाम गाळताय. हे घ्या सहा फायदे इंटरवल ट्रेनिंगचे. तेही चकटफू.
Next
- मयूर पठाडे
तुम्ही व्यायाम करता, खूप करता, पण त्यानं खरंच तुम्हाला फायदा होतो का? की तोच तोच व्यायाम करुन कंटाळा येतो? आणि अपेक्षित परिणामही साधला जात नाही? ना बॉडीला टोन येत, ना वजन कमी होत, ना फिटनेस दिसत?
असं जर होत असेल तर आपलं काही तरी चुकतंय किंवा आपल्या व्यायामाच्या पद्धतीत आपण बदल केला पाहिजे हे नक्की.
घाम तर आपण गाळतो, पण तो योग्य पद्धतीनं गाळतो का यालाही व्यायामात खूप महत्त्व आहे.
त्यासाठी काय कराल?
1- शारीरिक आणि मानसिक सुदृढता
व्यायामात इंटरवल घेतल्यामुळे केवळ तुमच्या शरीराचाच डौल सुधारणार नाही, तर मानसिकदृष्ट्याही तुम्ही कणखल व्हाल.
2- वजन झपाट्यानं कमी होईल
जर वजन कमी करणं, ते आटोक्यात ठेवणं हा जर तुमचा उद्देश असेल तर तो सफल झालाच म्हणून समजा.
3- कंटाळा पळून जाईल
व्यायामाला र्शीगणेशा करून काही दिवसांतच अनेक जण त्याला रामराम ठोकतात, याचं कारण त्यातला तोच तोचपणा. एकाच प्रकारचा व्यायाम आपण सातत्यानं करीत असतो. त्यामुळे कंटाळा येतो. हा कंटाळा व्यायामातील इंटरवलमुळे नाहीसा होईल आणि व्यायामाचा हुरुप वाढेल.
4- पैसा नको कि स्पेशल स्किल
तुम्ही व्यायामाला सुरुवात केली आहे, याचाच अर्थ सर्वात महत्त्वाची आणि बेसिक गोष्ट तुम्ही करता आहात. त्यातला योग्य प्रकार तेवढा फक्त समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी डोकं लावण्याचीही काही म्हणजे काहीच आवश्यकता नाही.
5- फिटनेस वाढेल
या पद्धतीनं एक्सरसाइज करून बघा, तुमची व्यायामाची नुसती क्षमताच वाढणार नाही, तर तुमचा स्टॅमिनाही चांगलाच वाढेल.
6- वेळेची बचत
आपण व्यायामात इंटरवल घेतोय, म्हणजे आपण वेळ वाया घालवतोय असं कोणाला वाटेल, पण ते पूर्णत: चुकीचं आहे. कारण या पद्धतीनं व्यायाम केल्यामुळे कमी वेळात आणि कमी दिवसांत तुम्हाला लगेच फरक दिसेल. शास्त्रज्ञांनी आणि जगभरातील फिटनेस एक्स्पर्ट्सचंही त्यावर एकमत आहे. मग आपल्याला करून पाहायला काय हरकत आहे?