टायटन्सने मुंबईकरांना लोळवले
By admin | Published: August 18, 2015 10:40 PM2015-08-18T22:40:53+5:302015-08-18T22:40:53+5:30
उपांत्य फेरीतील स्थान कधीच पक्के केलेल्या यू मुंबा व तेलगू टायटन्स या दोन बलाढ्य संघात झालेला सामना औपचारीकतेचा होता
विशाल शिर्के,पुणे
उपांत्य फेरीतील स्थान कधीच पक्के केलेल्या यू मुंबा व तेलगू टायटन्स या दोन बलाढ्य संघात झालेला
सामना औपचारीकतेचा होता.
मात्र यावेळी दोन्ही संघांनी आपआपल्या नवोदित खेळाडूंना संधी देताना मुख्य खेळाडूंना विश्रांती दिली. या सामन्यात तेलगू टायटन्सने अनुभवात कमी असलेल्या मुंबईकरांचा ४६-२५ असा फडशा पाडला.
बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीला मुंबईकरांनी नियंत्रित खेळ केला. मात्र तेलगू टायटन्सच्या आक्रमक खेळापुढे हळूहळू मुंबईकर मध्यंतराला २०-१२ असे तब्बल ८ गुणांनी पिछाडीवर गेले. यावेळी टायटन्सने यू मुंबावर एक लोन देखील चढवला.
मध्यंतरानंतर यू मुंबाचे खेळाडू कशाप्रकारे प्रतिकार करतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र खेळाडूंमध्ये असलेला अनुभव स्पष्टपणे दिसून आला. ३१व्या मिनिटाला मुंबईकरांवर दुसरा लोण चढवताना टायटन्सने
३२-१८ अशी मोठी आघाडी
घेतली. यावेळी पुर्णपणे दबावाखाली आलेल्या मुंबईकरांना आणखी पिछाडीवर टाकताना टायटन्सने
३७व्या मिनीटाला दुसरा लोण
चढवून ३९-२० अशी एकतर्फी आघाडी घेत विजयाची केवळ औपचारीकता बाकी ठेवली.
दरम्यान, मोठ्या पिछाडीनंतर मुंबईकरांनी प्रतिकार करण्याचे प्रयत्न देखील सोडल्याने सामना एकतर्फी व रटाळ झाला. अखेर टायटन्सने ४६-२५ अशा गुणांनी बाजी मारली. टायटन्सकडून आयसॅक अँथोनी,
रोहित बलियान आणि प्रशांत
राय यांनी दबदबा राखला. तर मुंबईकडून कर्णधार प्रदीप कुमारने तुफान चढायांसह अपयशी
झुंज दिली. भूपेंद्र सिंगने
अष्टपैलू खेळांसह त्याला चांगली
साथ दिली.