जोकोविचला नमवून वावरिंकाने पटकावले 'यूएस ओपन'चे जेतेपद
By admin | Published: September 12, 2016 08:12 AM2016-09-12T08:12:43+5:302016-09-12T08:14:00+5:30
जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने 'यूएस ओपन'चे जेतेपद पटकावले.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १२ - जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव करत स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने 'यूएस ओपन'चे जेतेपद पटकावले आहे. वावरिंकाने जोकोविचचा ६-७(१), ६-४, ७-५, ६-३ असा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. वावरिंकाचे हे कारकिर्दीतील तिसरे ग्रँडस्लॅम आहे.
जोकोविच या स्पर्धेत आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळला. कारण त्याला एका प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून वॉक ओव्हर मिळाला तर दोन खेळाडूंनी अर्ध्यावर लढतीतून माघार घेतली होती. यंदा ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या जोकोविच यूएस ओपनही जिंकण्याच्या उद्देशाने कोर्टवर उतरला, मात्र वावरिंकाने संधी साधत विजय मिळवला.
जोकोविचची वावरिंकाविरुद्धची कामगिरी १९-४ अशी आहे. वावरिंकाने २०१४ साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तर गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोचा पराभव केला होता. तर यंदा त्याने जोकोविचला यूएस ओपनमध्ये मात दिली आहे.
Stanislas Wawrinka wins #USOpen, beats Novak Djokovic 6-7 (1), 6-4, 7-5, 6-3
— ANI (@ANI_news) September 12, 2016