‘टॅलेंट सर्च पोर्टल’ आजपासून, ‘मन की बात’मध्ये मोदींचा उल्लेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:42 AM2017-08-28T00:42:49+5:302017-08-28T00:43:19+5:30
देशातील गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने ‘टॅलेंट सर्च पोर्टल’ सुरू केले आहे. हे पोर्टल उद्यापासून सादर होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील प्रसिद्ध ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.
नवी दिल्ली : देशातील गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने ‘टॅलेंट सर्च पोर्टल’ सुरू केले आहे. हे पोर्टल उद्यापासून सादर होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील प्रसिद्ध ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले, क्रीडा मंत्रालयाने तयार केलेल्या या पोर्टलद्वारे देशातील मुलांचा शोध घेतला जाईल. ज्या मुलांनी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवले असेल, अशा मुलांनी या पोर्टलवर बायोटाडा आणि व्हिडिओ अपलोड करावा. निवडलेल्या मुलांना क्रीडा मंत्रलयातर्फे प्रशिक्षण दिले जाईल.
देशात पहिल्यांदाच फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा होत आहे. ६ ते २८ आॅक्टोबर दरम्यान ही स्पर्धा असेल. जगातील २४ संघ स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येतील. या महोत्सवासाठी येणाºया नवयुवकांचे आपण स्वागत करूया. खेळाचा आनंद लुटूया. देशात खेळाचे वातावरण तयार करूया. विश्वचषकाच्या निमित्ताने आपणाला एका सुवर्णसंधी आहे. विदेशातील खेळाडूंसमोर आपली प्रतिभा सिद्ध करूया. २९ आॅगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस. हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करूया. आपला देश तरुणांचा देश आहे. तरुणांना खेळात समाविष्ट करीत त्यांच्यातील गुणवत्तेचा सन्मान करूया, असेही मोदींनी सांगितले. (वृत्तसंस्था)