आज भारत विरुद्ध चीन लढत, चायनीज बॉक्सर मैमतअलीशी लढण्यास विजेंदर सिंग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:06 AM2017-08-05T01:06:42+5:302017-08-05T01:06:50+5:30

खेळ सर्वांना एकत्रित आणतो आणि तेच काम मी करणार आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये बॉर्डरवर गंभीर वातावरण आहे. परंतु, हा खेळ आहे.

Today vs India vs China, Vijender Singh ready to fight against Chinese footballer Mumtaz Ali | आज भारत विरुद्ध चीन लढत, चायनीज बॉक्सर मैमतअलीशी लढण्यास विजेंदर सिंग सज्ज

आज भारत विरुद्ध चीन लढत, चायनीज बॉक्सर मैमतअलीशी लढण्यास विजेंदर सिंग सज्ज

Next

मुंबई : खेळ सर्वांना एकत्रित आणतो आणि तेच काम मी करणार आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये बॉर्डरवर गंभीर वातावरण आहे. परंतु, हा खेळ आहे. जुल्फिकरविरुद्धची लढत भारत विरुध्द चीन अशीच आहे. मी देशासाठी लढणार असून रिंगमध्ये नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने व्यक्त केला.
व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून सलग आठ लढती जिंकलेला भारताच्या स्टार बॉक्सर विजेंदर सिंग रविवारी सलग नववी लढत जिंकण्याच्या निर्धाराने मुंबईत रिंगमध्ये उतरेल. यावेळी चीनचा अव्वल बॉक्सर जुल्फिकर मैमतअली याला नमविण्याचे कडवे आव्हान विजेंदरपुढे असेल. विशेष म्हणजे दोन्ही बॉक्सर या लढतीमध्ये आपले वैयक्तिक विजेतेपद पणाला लावणार असल्याने या लढतीची उत्सुकता वाढली आहे. या लढतीआधी दोन्ही खेळाडूंचे वजन तपासण्यात आले. यावेळी विजेंदरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुंबईतील वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये रंगणाºया या लढतीमध्ये भारताचा माजी आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर आपले डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वत:कडे ठेवण्यासह जुल्फिकरचे डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट जेतेपदही मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
विजेंदरने यावेळी म्हटले की, ‘रविवारच्या लढतीसाठी मी पुर्णपणे सज्ज असून मला विजयाचा विश्वास आहे. हा भारत विरुद्ध चीन असा सामना आहे आणि याविषयी अधिक काही बोलण्याची मला गरज नाही. मी खूप उत्साहित असून संपुर्ण देश माझ्या पाठिशी आहे. ही लढत नक्कीच शानदार होईल आणि यामध्ये भारत विजयी होईल. शुक्रवारी माझे वजन ७८ किलो होते. लढतीसाठी वजन ७६.२ किलो असणे आवश्यक होते. त्यामुळे मी काहीच खाल्ले नाही. शनिवारी वजन तपासले तेव्हा ७६ किलो होते. त्यामुळे आता मी भरपूर खाणार आहे.’
आपल्या योजनांविषयी विजेंदर म्हणाला की, ‘प्रतिस्पर्धी बॉक्सरच्या खेळानुसार मी माझ्या योजना ठरवेल. मी त्याच्यानुसार खेळ करेल. या लढतीसाठी मी माझ्या तंत्रामध्ये अनेक बदल केले आहेत.’ दरम्यान रविवारी मुंबईत एकूण सात लढती होणार असून यावेळी आॅलिम्पियन अखिल कुमार आणि जितेंदर कुमार व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करतील.
......................................

मी महाराष्ट्रात याआधी लढलोय, पण मुंबईत पहिल्यांदाच लढणार आहे. आॅलिम्पिक पदक मिलवल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आलो होतो. मुंबईकर क्रीडाप्रेमी आहेत. ते खेळावर प्रेम करतात. तिकिट खरेदीवर मुंबईकर खर्च करतात. त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे.
- विजेंदर सिंग
............................

Web Title: Today vs India vs China, Vijender Singh ready to fight against Chinese footballer Mumtaz Ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.