संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या लढतीची उत्सुकता शिगेला; महाराष्ट्र केसरीसाठी अभिजित कटके व किरण भगत यांच्यात लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 03:11 AM2017-12-24T03:11:53+5:302017-12-24T03:12:03+5:30
एकापाठोपाठ एक उत्कंठावर्धक लढतींची मालिका अखंडितपणे आज पाहण्यास मिळाली. इतिहासातील तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा पराक्रम केला ती मुळशीच्या तानाजी झुंजुरकेने तगड्या देहाचा आणि प्रचंड ताकदीचा बाला रफीक शेख याला दिलेली झुंज सिंहगडच्या सिंहाइतकाच अतुलनीय होती.
- दिनेश गुंड
एकापाठोपाठ एक उत्कंठावर्धक लढतींची मालिका अखंडितपणे आज पाहण्यास मिळाली. इतिहासातील तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा पराक्रम केला ती मुळशीच्या तानाजी झुंजुरकेने तगड्या देहाचा आणि प्रचंड ताकदीचा बाला रफीक शेख याला दिलेली झुंज सिंहगडच्या सिंहाइतकाच अतुलनीय होती. तानाजी झुंजुरकेचा झालेला पराभवसुद्धा इतका कौतुकास्पद होता की उपस्थित प्रेक्षकांनी टाळ््यांच्या गजरात तानाजीचे केलेले चिवट झुंजीचे अभिनंदन त्याची साक्ष देऊन गेले. गादी विभागात अंतिम फेरीच्या लढतीत अभिजित कटकेने सुरुवातीपासून घेतलेला आक्रमक पवित्रा त्याच्या एकतर्फी विजयाचा शिल्पकार ठरला. आपल्या उंचीचा आणि भक्कम ताकदीचा उपयोग करत अभिजितने एकेरी पट, भारंदाज हप्ते डाव करत १० गुण मिळवून तांत्रिक गुणाधिक्यावर विजय मिळवित सलग दुसºया वर्षी महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीत धडक मारली.
दुसºया बाजूने साताºयाच्या किरण भगतने प्रेक्षणीय लढती करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. माती विभागात अंतिम फेरीत बलाढ्य ताकदीचा बाला रफीक शेख याच्याबरोबर दिलेली चिवट झुंज त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ देऊन गेली. आपल्या झुंजार खेळाच्या प्रदर्शनाने किरण भगतने अनपेक्षित अशी आक्रमणे करत बाला रफीकला हतबल केले आणि डोळ््याच्या पापण्या मिटण्याइतक्या अवधीत एकेरी कस काढून चितपट करीत माती विभागातून महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीसही आपले आव्हान उभे केले. भूगाव मुक्कामी उद्या साताºयाचा एक चपळ चित्ता, तर दुसºया बाजूने पुणे शहराचा ढाण्या वाघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. ४२ व्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरण्यासाठी सातारा जिल्ह्याचा आणि पुण्यामध्ये अर्जुनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारा किरण भगत आपल्या भात्यामध्ये अनेक घातकी डाव ठेवून गदेला हात घालण्यासाठी सरसावून आहे. दुसºया बाजूने उपमहाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी किताबाला दिलेली झुंज आणि मागील महिन्यात जमखंडीला मिळविलेला भारत केसरीचा मानकरी अभिजित कटके हा आक्रमक पवित्रा घेऊन गतवर्षी हुलकावणी दिलेला महाराष्ट्र केसरी किताबाला आपल्या भक्कम खांद्यावर विराजमान करण्यासाठी तयार आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात उद्याच्या या लढतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, यात शंकाच नाही.