आज काट्याची टक्कर

By admin | Published: May 20, 2015 01:35 AM2015-05-20T01:35:06+5:302015-05-20T01:35:06+5:30

आयपीएल हंगामाचे अंतिम पर्व सुरू झाले असून, त्यात बुधवारी (दि.२०) राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंज बंगळुरू या तुल्यबळ संघात लढत होत आहे.

Today's thorn bump | आज काट्याची टक्कर

आज काट्याची टक्कर

Next

राजस्थान-बंगळुरू लढत : टीम विराट कोहली-स्टीव्ह स्मिथ समोरासमोर
पुणे : आयपीएल हंगामाचे अंतिम पर्व सुरू झाले असून, त्यात बुधवारी (दि.२०) राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंज बंगळुरू या तुल्यबळ संघात लढत होत आहे. दोन्ही संघांनी एकमेकांविरोधात ७ विजय मिळविले आहेत. कागदावर विराट कोहलीचा बंगळुरू संघ ताकदवान दिसत असला तरी स्टीव्ह स्मिथच्या राजस्थान संघाच्या खेळाडूंची खेळी देखील रॉयलच आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बाजी मारून अंतिम सामन्याच्या दिशेने पहिले पाऊल कोणाचे पडते,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री ८ वाजता या दोन संघांत लढत होणार आहे. स्टीव स्मिथच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानने साखळी सामन्यांतील अखेरचा सामना खिशात घालत अंतिम ४ संघांत स्थान पटकावले आहे. शेन वॉटसनच्या नाबाद १०४ धावांच्या घणाघाती शतकी खेळीने राजस्थानने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर संघाला धूळ चारत बाद फेरीत प्रवेश केला. राजस्थानचा अजिंक्य राहणे चांगलाच बहरात असून, त्याने १३ सामन्यांत ४९८ धावा केल्या आहेत. रहाणेच्या पुढे सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर असून, त्याच्या खात्यात १४ सामन्यांत ५६२ धावा आहेत. मात्र वॉर्नरचा संघ अंतिम ४ जणांच्या संघात स्थान मिळवू शकला नाही.
आॅस्ट्रेलियाच्या जेम्स फॉकनरने देखील राजस्थानसाठी उपयुक्त खेळाडूची भूमिका बजावली आहे. कोणत्याही स्थितीत उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. दक्षिण आफ्रिकेचा मध्यमगती गोलंदाज क्रिस मॉरिस देखील यशस्वी ठरला आहे. संजू सॅमसन, करुण नायर, धवल कुलकर्णी यांची कामगिरी चांगली होत आहे.
राजस्थान व बंगळुरू संघाचे गुण समान असले तरी चांगल्या धावगतीमुळे बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सने मुंबईविरुद्ध १० मे रोजी झालेल्या सामन्यात नाबाद १३३ धावांची आक्रमक खेळी केली होती. ख्रिस गेल याने देखील शतकी खेळी
केलेली आहे. या शिवाय कोहलीसारखा आक्रमक फलंदाजही त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीत मिशेल स्टार्क व यजुवेंद्र चहल यासारखे गोलंदाज आहेत.
राहुल द्रविडकडे पालकत्व असलेल्या राजस्थानचा संघ २००८च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. तर २००९ व २०११ सालच्या स्पर्धेतील उपविजेत्या आरसीबीचा संघ देखील हुलकावणी देणाऱ्या पहिल्या विजेतेपदाच्या दृष्टीने कामगिरी करण्यास उत्सुक असेल. हा सामना गमविणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तर विजयी संघ दुसरा क्वालिफायर खेळेल.

हेड टू हेड
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध १६ वेळा खेळले आहेत. यामध्ये बंगळुरू आणि राजस्थानने प्रत्येकी ७ वेळा विजय नोंदविला आहे. दोन लढतींचा निकाल लागू शकला नाही.

विराट कोहली (कर्णधार),
एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, दिनेश कार्तिक, मिशेल स्टार्क, निक मेडिनसन, वरुन आरॉन, यजुवेंद्र चहल, विजय झोल,
अबू नेचिम अहमद, हर्षल पटेल, अशोक डिंडा, मनविंदर बिस्ला, सीन एबॉट, जलज सक्सेना,
सर्फराज खान, शिशिर बावणे, एस. अरविंद.

अजिंक्य रहाणे (कर्णधार), शेन वॉटसन, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, संजू सॅमसन, करुण नायर, धवल कुलकर्णी, टीम साऊदी, स्टुअर्ट बिन्नी, ख्रिस मॉरिस, प्रवीण तांबे, अभिषेक नायर, प्रदीप साहू, रस्टी थेरोन, दिनेश साळुंके, विक्रमजित मलिक, राहुल तेवातिया, रजत भाटिया,सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक, अंकीत शर्मा.

Web Title: Today's thorn bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.