आजपासून ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

By admin | Published: December 25, 2014 01:50 AM2014-12-25T01:50:18+5:302014-12-25T01:50:18+5:30

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगणार आहे़

From today's thrill of 'Maharashtra Kesari' | आजपासून ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

आजपासून ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

Next

अरुण वाघमोडे, अहमदनगर
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार गुरुवारपासून वाडिया पार्क क्रीडा संकुलात रंगणार आहे़ गुरुवारी सायंकाळी चार वाजता क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, यावेळी अन्न व नागरी विकास मंत्री गिरीश बापटही उपस्थित राहणार आहेत़ त्यानंतर गादी आणि मातीवरील कुस्त्यांना प्रारंभ होईल़
स्पर्धेसाठी राज्यातील ४४ संघ बुधवारीच शहरात दाखल झाले आहेत़ या मल्लांचे वजन आणि वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे़ ३६ वर्षांनंतर नगरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली. आयोजकांच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे़ जिल्हा तालीम संघ आणि छबू लांडगे प्रतिष्ठानच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांसाठी तीन व्यासपीठ बनविण्यात आले असून, सुरक्षिततेसाठी मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट, प्रत्येक लढतीचे व्हिडीओ चित्रण होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: From today's thrill of 'Maharashtra Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.