टोकियो आॅलिम्पिक तिकिटांचे दर घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:05 AM2018-07-21T04:05:40+5:302018-07-21T04:06:12+5:30
टोकियोमध्ये २०२० ला होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तिकीट दरांची आज घोषणा करण्यात आली
टोकियो : टोकियोमध्ये २०२० ला होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तिकीट दरांची आज घोषणा करण्यात आली असून १८ डॉलरपासून (२०२० येन) २७६० डॉलरपर्यंत तिकीट दर राहतील. तिकिटांचे दर जवळजवळ २०१२ मध्ये लंडनमध्ये झालेल्या आॅलिम्पिकच्या तिकिटांच्या दरांप्रमाणेच आहेत तर रिओ आॅलिम्पिकच्या तुलनेत महाग आहेत.
आयोजकांच्या मते अर्ध्यापेक्षा अधिक तिकिटांचे दर ८,००० येनपेक्षा (७१ डॉलर) कमी आहे. उद््घाटन समारंभाच्या तिकिटांचे दर १२,००० येन (११० डॉलर) पासून ३००,००० येन (२,६७० डॉलर) दरम्यान आहे तर क्रीडा स्पर्धांच्या तिकिटांचे दर फार कमी ठेवण्यात आलेले आहेत.
ज्या तिकिटांचे दर २,०२० येन ठेवण्यात आली ती तिकिटे सामूहिक विक्रीसाठी उपलब्ध असतील. वैयक्तिक तिकिटांची सुरुवातीची किंमत २,५०० येन (२२ डॉलर) ठेवण्यात आली आहे. मैदानी स्पर्धांच्या तिकिटांचे दर सर्वांत अधिक ३००० येन पासून १,३०,००० येन पर्यंत तर मॅरेथॉन, सॉफ्टबॉल, हॉकी आणि दुसºया खेळांच्या तिकिटांचे दर २,५०० येनपासून सुरू होतील. तिकीट विक्री प्रारंभ होण्याच्या तारखांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही, पण पुढील वर्षी तिकीट विक्रीला प्रारंभ होईल.
स्थानिक मीडियातील वृत्तानुसार टोकियो आॅलिम्पिक समितीला
७८ लाख तिकीट विक्री होण्याची आशा आहे. त्यात त्यांना ७७.३०
अब्ज येनची कमाई अपेक्षित
आहे. (वृत्तसंस्था)