Tokyo Olympic ११३ ऑलिम्पिक पदकं महत्त्वाची की ३?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 PM2021-08-12T16:16:01+5:302021-08-12T16:16:32+5:30
सान मारिनो नावाच्या चिमुकल्या देशाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दर ११,३१३ नागरिकांच्या मागे एक पदक मिळालं.
सान मारिनो नावाच्या चिमुकल्या देशाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये दर ११,३१३ नागरिकांच्या मागे एक पदक मिळालं. पदकतालिकेत सर्वोच्च स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या एकूण पदकांना त्या देशाच्या लोकसंख्येने भागलं , तर उत्तर येतं : २९ लाख १५ हजार ७८९ नागरिकांच्या मागे एक पदक ! खरंतर सान मारिनोला मिळाली आहेत फक्त ३ ऑलिम्पिक पदकं आणि चीनलाही मागे लोटलेल्या अमेरिकेला ११३.
लोकसंख्येच्या प्रमाणात ऑलिम्पिक पदकांचा हिशेब घालायला गेलं तर जगभरातील देशांच्या यादीत अमेरिकेचा क्रमांक साठावा आणि चीनचा अठ्ठ्यातरावा ! जेमतेम ३४००० लोकसंख्येचा सान मारिनो; पण या देशातल्या खेळाडूंनी २ रौप्य आणि १ कांस्य अशी तीन पदकं जिंकली. त्याखालोखाल असलेल्या बर्म्युडा, ग्रेनेडा आणि बहामाज या देशांची नावंही आपल्याला नवीच.