Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 03:18 PM2021-08-05T15:18:18+5:302021-08-05T15:18:45+5:30

Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले.

Tokyo Olympic 2020 : 41-year Olympic drought ends. How Naveen Patnaik helped Indian hockey | Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास!

Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास!

Next

Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. भारतीय हॉकीचा हा सुवर्णकाळ पुन्हा पाहायला मिळाल्याबद्दल लोकं ओदिशा सरकारचे आभार मानत आहेत. 

ओदिशा सरकारनं २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला आणि ज्युनियर, सीनियर, पुरुष व महिला राष्ट्रीय संघासाठी १५० कोटींचा करार केला. २०२३पर्यंत हा करार आहे आणि याशिवाय ओदिशा सरकार वर्ल्ड क्लास ट्रेनिंग, रिहॅब फॅसिलिटी, प्रॅक्टिस पिचच्या माध्यमातून भारतीय हॉकीला संजिवनी दिली आहे. त्यामुळेच हॉकी इंडियासोबत ओदिशा सरकार व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानले जात आहे.
 




२०१३पासून ओदिशा सरकार हॉकीला प्रमोट करत आहे. २०१३मध्ये हॉकी इंडिया लीग खेळवण्यात आली तेव्हा ओदिशा राज्यातील दोन व्यावसायिकांनी कलिंगा लँसर्स फ्रँचायझी खरेदी केली. २०१४मध्ये ओदिशा सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१७ हॉकी वर्ल्ड लीग आणि २०१८ हॉकी वर्ल्ड कप येथे झाला होता. २०२३ चा हॉकी वर्ल्डकपही येथे आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

ओदिशाचे मुख्यमंज्ञी नवीन पटनायक यांनी भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला.  


 

सहारा इंडिया परिवारानं केलं हॉकी संघाचे अभिनंदन
भारतीय हॉकी संघाला २२ वर्ष प्रायोजकत्व देणाऱ्या सहारा इंडिया परिवारानंही आजच्या यशानंतर खेळाडूंचे अभिनंदन केले.  हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Tokyo Olympic 2020 : 41-year Olympic drought ends. How Naveen Patnaik helped Indian hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.