Tokyo Olympic, Bajrang Punia: बजरंगाची कमाल!; भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानं जिंकलं कांस्यपदक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 04:20 PM2021-08-07T16:20:32+5:302021-08-07T16:27:33+5:30
Tokyo Olympic, Bajrang Punia : गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे बजरंग संपूर्ण स्पर्धेत बचावात्मक खेळ करतानाच दिसला, जो त्याच्या मुळ स्वभावाच्या परस्पर विरोधी आहे. त्यामुळे सर्व अचंबित होते, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
Tokyo Olympic, Bajrang Punia : ६५ किलो वजनी गटाच्या कांस्यपदकासाठीच्या पहिल्या सामन्यात रशियन ऑलिम्पिक समितीच्या राशिदोव्ह गॅडझीमुरादनं ५-० असा एकतर्फी निकालात हंगरीच्या इस्जमेल मुस्जूकायेव्हचा पराभव केला. तमाम भारतीय हा सामना कधी संपतो याची प्रतिक्षाच पाहत होते आणि त्याला कारणही तसंच होतं. भारताचा बजरंग पुनियाचा सामना यानंतर होणार होता. बजरंगला ६५ किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या डौलेट नियाझबेकोव्हकडून कडवी टक्कर मिळाली. संपूर्ण स्पर्धेत बचावात्मक खेळ करणारा बजरंग आज आक्रमक पवित्र्यात दिसला आणि त्या जोरावर त्यानं कांस्यपदक नावावर केले. ( Bajrang Punia wins the bronze medal in men's 65kg freestyle wrestling)
News Flash:
— India_AllSports (@India_AllSports) August 7, 2021
Bajrang Punia wins Bronze medal.
Bajrang BEAT reigning World Silver medalist Daulet Niyazbekov 8-0.
Its 6th medal for India at Tokyo 🥳 #Tokyo2020#Tokyo2020withIndia_AllSportspic.twitter.com/XFf5NAB2Ha
कांस्यपदकाच्या लढतीतही बजरंगनं सावध सुरुवातीवरच भर दिला. पहिल्या मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडूची ताकद आजमावल्यानंतर बजरंगनं काहीसा आक्रमक खेळ केला. त्यानं ३० सेकंदाच्या पेनल्टी कालावधीत एक गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर नियाझबेकोव्हनं त्याची पकड करण्याचा प्रयत्न केला, परंतु बजरंगनं यश मिळवत त्याची पकड सैल केली. पहिल्या तीन मिनिटांत बजरंगनं २-० अशी आघाडी घेतली. ( Bajrang holds a 2-0 lead against Daulet Niyazbekov after the 1st round of this 65kg bronze medal match.)
बजरंग मुळ आक्रमक पवित्र्यात परतला अन् सातत्यानं कझाकिस्तानच्या खेळाडूवर दडपण निर्माण केले. बजरंगनं अँकल पकड करताना खात्यात आणखी दोन गुण जमा केले अन् आघाडी ४-० अशी भक्कम केली. बजरंगनं काऊंटर अटॅक करताना पुन्हा दोन गुण घेतले. बजरंगला ८-० असा सामना जिंकला. भारताचे टोकियोतील कुस्तीतील हे दुसरे पदक आहे. रवी कुमार दहियानं ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले आहे. भारताचे हे सहावे पदक ठरले.
#TokyoOlympics | Wrestler Bajrang Punia wins #Bronze medal in Men's Freestyle 65kg against Kazakhstan's Daulet Niyazbekov, 8-0
— ANI (@ANI) August 7, 2021
(File pic) pic.twitter.com/LzMlCHxzaK
उपांत्य फेरीत बजरंगला २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील ( ५७ किलो वजनी गट) कांस्यपदक विजेत्या अझरबैजानच्या आलीयेव्ह हाजीने पराभूत केले. हिल्या तीन मिनिटांत हाजीनं ४-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या टप्प्यात अझरबैजानच्या खेळाडूनं भारी डाव टाकून ८-१ अशी आघाडी घेतली. अखेरच्या एक मिनिटांत त्याला पाच गुणांची पिछाडी भरून काढायची होती. बजरंगनं चार गुण घेतले, परंतु त्यानं तीन गुण दिलेही. त्यामुळे बजरंगला ५-१२ अशी हार मानावी लागली.
२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगनं सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या नावावर २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे रौप्यपदक आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बजरंगनं २०१९ व २०१३ चे कांस्य आणि २०१८चे रौप्यपदक आहे. आशियाई स्पर्धेतही त्यानं एक सुवर्ण ( २०१८) व एक रौप्य ( २०१४) पदक जिंकले आहे. २०१५मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार, २०१९मध्ये पद्म श्री व खेल रत्न पुरस्कारानं सन्मानित केले आहे.