Tokyo Olympic, Deepak Punia : दीपक पुनियानं 'सुवर्ण'संधी गमावली, अमेरिकेच्या खेळाडूनं काही मिनिटांतच बाजी मारली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:30 PM2021-08-04T15:30:07+5:302021-08-04T15:38:59+5:30
Tokyo Olympic 2020, Deepak Punia : रवी कुमार दहियानंतर भारताच्या दीपक पुनियाकडून अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षा होत्या,
Tokyo Olympic 2020, Deepak Punia : रवी कुमार दहियानंतर भारताच्या दीपक पुनियाकडून अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षा होत्या, परंतु अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर यानं पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करताना ९-० अशी भक्कम आघाडी घेतली आणि त्यानं १०-० असा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपककडे अजूनही कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. ( Deepak Punia bows out against USA's Taylor III )
News Flash:
— India_AllSports (@India_AllSports) August 4, 2021
Deepak Punia loses Semis bout (FS 86kg) 0-10 to former World Champion David Taylor.
It was almost like Deepak was fighting against an opponent from higher weight category.
Deepak will now fight for Bronze medal. #Tokyo2020#Tokyo2020withIndia_AllSportspic.twitter.com/B6I1dK7dTp
#IND's second seed Deepak Punia lost 0-10 by technical superiority to #USA's David Morris Taylor III, missing out on advancing to the #gold medal match! #Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | #Wrestling
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या गटात दीपक पुनिया आणि चीनचा शेन यांच्यातील ही लढत रोमहर्षक झाली. या लढतीत दीपक पुनियाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र खेळाच्या मध्यावर चिनी कुस्तीपटूने जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपण्यासाठी काही सेकंदांचा वेळ असताना दीपकने निर्णायक डाव खेळत २ गुण कमावले आणि विजय निश्चित केला.
रवी कुमारची मुसंडी...
कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाचा उपांत्य फेरीचा सामना भारताचा रवी कुमार दहिया आणि कझाकिस्तानचा नुरीस्लॅम सानायेव्ह यांच्यात खेळवण्यात आला. ( Ravi Dahiya play the semifinal match against KAZ SANAYEV Nurislam) रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१२नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे. ( Silver medal assured! Ravi Dahiya first Indian since Sushil in 2012 to enter the wrestling finals in Olympics)
रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं २-१ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग ( मगर पकड) करत ८ गुण कमावले अन् ९-२ अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून ३ गुण घेत पिछाडी ५-९ अशी कमी केली. कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. अन Victory by fall नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले.