"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:05 PM2021-08-10T12:05:34+5:302021-08-10T12:06:24+5:30

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली.

Tokyo Olympic 2020: former Indian athlete Anju Bobby George praises PM Narendra Modi for India's Olympic success | "UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

"UPA सरकारकडून हवा तसा पाठिंबा नव्हता; ऑलिम्पिकमधील भारताच्या यशाचं श्रेय पंतप्रधान मोदींना!"

googlenewsNext

Tokyo Olympic 2020 : भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १ सुवर्ण, दोन रौप्य व ४ कांस्य अशा एकूण ७ पदकांची कमाई केली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही आतापर्यंतची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी २०१२ मध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक जिंकले, तर भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर प्रतिक्रिया देताना माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार जे खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे होते, यांचे आभार मानले. ( former Indian athlete Anju Bobby George thanked PM Narendra Modi and his government's support behind India's marked improvement at the Olympics)

Neeraj Chopra : तुम्हाला माहित्येय का? गोल्डन बॉय नीरज चोप्रासाठी भारत सरकारनं खर्च केले किती कोटी?

२००४च्या अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज लांब उडीत पाचव्या क्रमांकावर राहिली होती आणि तिनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ६.८३ मीटर लांब उडी मारली होती. यावेळी अंजू बॉबी जॉर्ज यांनी अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेतील दिवसांना उजाळा दिला. सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर बोलताना त्या म्हणाल्या, ''आमच्या काळात आपले क्रीडा मंत्री ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये पाहुणे म्हणून यायचे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर भारतात मोठा जल्लोष साजरा केला गेला, परंतु मंत्र्यांकडून त्याला फार महत्त्व दिले गेले नाही. तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी माझे अभिनंदन केले, त्यापलिकडे काहीच नव्हते.''

गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

आता खेळाडूंना मिळत असलेले महत्त्व मिस करत असल्याचेही त्या म्हणाल्या. ''भारत सरकार खेळाडूंना खूप महत्त्व देत आहे. पदक जिंकल्यानंतर आपले पंतप्रधान स्वतः खेळाडूंना फोन करत आहेत. त्यामुळे खेळाडूंनाही ही संधी सोडावीशी वाटत नाही. भारतात काहीतरी मोठं होत आहे. मी याचा भाग नसल्यानं मी हे सर्व मिस करतेय,''असेही त्या म्हणाल्या.  

देशातील सध्याची क्रीडा संस्कृतीबाबत बोलताना अंजू यांनी या सरकारनं ग्रासरूट ( खालच्या स्तरापासून) लेव्हलपासून सोयी सुविधा पुरवल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ते खूप सहकार्य करत आहेत. ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. प्रत्येक खेळाडूवर त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच रिझल्ट मिळत आहेत. ग्रासरूट लेव्हलपासून ते काम करत आहेत. त्यांच्याकडे दीर्घकालीन आराखडा आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण आतापासूनच २०२८ व २०३२च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आराखड्यावर काम करत आहेत. सिस्टम असेच काम करते. आता युवा खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. असाच पाठिंबा मिळत राहिला, तर भारत एक दिवस नक्की अव्वल क्रमांकावर असेल.''

भारतीयांची अविश्वसनीय कामगिरी; निरोप समारंभात डौलानं फडकला तिरंगा, जाणून घ्या मेडल टॅलीत कितव्या स्थानी!

स्वतः क्रीडापटू असलेले क्रीडा मंत्री आपल्याला मिळाले आणि हे ऑलिम्पिक यशामागचे एक कारण आहे. त्या म्हणाल्या,'' किरण रिजिजू ( माजी क्रीडा मंत्री) त्यांना खेळाची प्रचंड आवड होती आणि ते प्रत्येक खेळाडूला ओळखायचे.  आम्ही जेव्हा मॅसेज किंवा कॉल करायचो, ते मदतीसाठी उपलब्ध असायचे. नवीन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर सह हेही खेळाडू आहेत आणि तेही चांगले काम करत आहेत. अशा प्रकारचा पाठिंबा मंत्र्यांकडून व सिस्टमकडून अपेक्षित आहे.'' 

Web Title: Tokyo Olympic 2020: former Indian athlete Anju Bobby George praises PM Narendra Modi for India's Olympic success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.