Tokyo Olympic, Neeraj Chopra : 'मी हे सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो'; ऐतिहासिक कामगिरीनंतर भावूक झाला नीरज चोप्रा, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:42 PM2021-08-07T20:42:44+5:302021-08-07T20:43:14+5:30
Tokyo Olympic, Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १२५ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले अन् तेही सुवर्ण...
Tokyo Olympic, Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १२५ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले अन् तेही सुवर्ण... तांत्रिकदृष्ट्या अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक आहे. १९००च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नॉर्मन प्रिचर्ड यांनी२०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकलेले पदक हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे नीरजच्या या पदकाचे मोल भारतीयांसाठी खूप आहे. नीरजने हे पदक दिवंगत दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले.
THE THROW THAT WON #IND A #GOLD MEDAL 😍#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion@Neeraj_chopra1pic.twitter.com/F6xr6yFe8J
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 7, 2021
२३ वर्षीय भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. त्यानं पहिल्या दोन प्रयत्नात ८७ मीटर अंतर पार केले अन् प्रतिस्पर्धी त्याच्या जवळपासही पोहोचले नाही. प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. या विजयानंतर नीरज म्हणाला, मी हे पदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. ते जिथे कुठे असतील त्यांनी मला खेळताना नक्की पाहिले असेल, अशी मी आशा करतो.''
What a moment. What a champion. 🙌
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 7, 2021
This is the moment all of #IND had been waiting for. 😍 #Gold#Tokyo2020 | #BestOfTokyo | #UnitedByEmotion | #StrongerTogether | @Neeraj_chopra1pic.twitter.com/sJbBkLiWpr
मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात पदक जिंकावे अशी त्यांची शेवटची इच्छा होती अन् ती आज नीरजनं पूर्ण केली. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. फोटो फिनिशमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मॅलकॉल्म स्पेन्सने कांस्यपदक जिंकले.
We lost a Gem. He will always remain as an inspiration for every Indian. May his soul Rest in peace🙏🇮🇳 pic.twitter.com/7gT2x8Bury
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) June 18, 2021