Tokyo Olympic, Neeraj Chopra : १३० कोटी भारतीयांसाठी 'सोनेरी' क्षण; भालाफेकपटू नीरज चोप्राने जिंकलं ऐतिहासिक 'गोल्ड मेडल'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 05:39 PM2021-08-07T17:39:19+5:302021-08-07T17:43:07+5:30
Tokyo Olympic, Neeraj Chopra : मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण, अॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला.
Tokyo Olympic, Neeraj Chopra : मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकानं थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण, अॅथलेटिक्समधील इतिहास आज नीरज चोप्रानं बदलला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अॅथलेटिक्समधील 125 वर्षांचा भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. ( Men's javelin throw final) भालाफेकीच्या अंतिम फेरीत उतरलेला नीरजच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. त्यानं पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. २००८नंतर ( अभिनव बिंद्रा, नेमबाज) ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला. ( HISTORY!! Neeraj Chopra wins Javelin Throw gold, becomes only second Indian to win individual gold after Abhinav Bindra in 2008.)
Neeraj Chopra 🇮🇳 87.58m takes GOLD🥇in the men's javelin throw at the #Tokyo2020.
— Mohandas Menon (@mohanstatsman) August 7, 2021
- India's first-ever athletics medal in #Olympics.
- India's 7th medal at #Tokyo2021, their highest ever tally in one #OlympicGames, surpassing their tally of 6 medals in London2012.#TokyoOlympics
नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. क्रमवारीनुसार त्याला दुसऱ्या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. ( Neeraj starts with massive 87.03m in 1st attempt. ) रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हाच्या अॅड्रीयन मार्डारे हा प्रथम भालाफेकीसाठी आला अन् त्यानं ८१.१६ मीटर लांब भालाफेक केली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करताना ८५.३० मीटर लांब भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं पहिल्या प्रयत्नात ८२.४० मीटर लांब भालाफेक केली. चेक रिपब्लिकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ८३.९८ मीटरचे अंतर गाठून पहिल्या फेरीअखेरीस टॉप फाईव्हमध्ये स्थान पक्के केले. नीरजनं अव्वल स्थान टिकवून ठेवले. ( Neeraj Chopra from #TeamIndia is leading after the first round in #Javelin at #Tokyo2020)
दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. ( Neeraj Chopra second attempt: 87.58) त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सहकारी अन् प्रशिक्षकांनी पदकाचा जल्लोष तेव्हाच सुरू केला. नीरजनं सेट केलेल्या लक्ष्याचा आसपासही प्रतिस्पर्धींना फिरकता आले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ज्युलियनला दुसऱ्या प्रयत्नात ७७.९० मीटर भाला फेकता आला. नीरजची भालाफेक पाहून प्रतिस्पर्धी दडपणात गेलेले दिसले. तिसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजला ७६.७९ मीटर लांब भालाफेकता आला. चेक प्रजासत्ताकच्या व्हितेझस्लॅव्ह व्हीसलीनं तिसऱ्या प्रयत्नांत ८५.४४ मीटर लांब भाला फेकून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानच्या नदीमनं ८४.६२ मीटर लांब भालाफेकून पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.
Neeraj Chopra:
— India_AllSports (@India_AllSports) August 7, 2021
3rd attempt: 76.79m
2nd attempt: 87.58m
1st attempt: 87.03m #Tokyo2020withIndia_AllSports
पहिल्या तीन प्रयत्नांनंतर १२पैकी ८ स्पर्धकच पदकाच्या शर्यतीत कायम राहिले आणि त्यात नीरज अव्वल स्थानावर व पाकिस्तानचा नदीम चौथ्या स्थानावर होता. आश्चर्याचा धक्का म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड धारक जर्मनीचा जॉहानेस वेटर हा बाद होणाऱ्या स्पर्धकांमध्ये होता. त्यानं दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नांत फाऊल केले. ( World Record holder Vetter Johannes out of the contest in men's #JavelinThrow #olympics #Tokyo2020). चौथ्या प्रयत्नात नीरजकडून फाऊल झाला. पण तरीही नीरज सुवर्णपदकाचा दावेदारच होता.
Neeraj Chopra:
— India_AllSports (@India_AllSports) August 7, 2021
4th attempt: Foul
3rd attempt: 76.79m
2nd attempt: 87.58m
1st attempt: 87.03m
After 4 rounds, Neeraj leading the fray.
2 attempts left. #Tokyo2020withIndia_AllSports
चेक प्रजासत्ताकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ५व्या प्रयत्नात ८६.६७ मीटर अंतर पार करून रौप्यपदकाच्या शर्यतीत धडक मारली. पाकिस्तानचा नदीम पाचव्या स्थानी घसरला. नीरजनं पाचव्या प्रयत्नातही फाऊल केला. पण नीरजला चिंता करण्याचं कारण नव्हतं. त्यानं पहिल्या दोन प्रयत्नात मारलेली मजल ही त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेशी होती. पाकिस्तानच्या नदीमला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, ८५.६२ मीटर ही त्याची फायनलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
नीरजचा सामना पाहण्यासाठी त्याच्या गावी जय्यत तयारी....
Huge screen set near @Neeraj_chopra1 's home in Khandra village, Haryana. Villagers cheer at the first sight of Neeraj. @IExpressSports#Tokyo2020pic.twitter.com/abulVoWUck
— Andrew Amsan (@AndrewAmsan) August 7, 2021
तुम्हाला हे माहित्येय का?
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक ( १९००) स्पर्धेत २०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकलेले पदक हे भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती.
THE KING BRINGS IT HOME 🇮🇳
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2021
125 years of wait ends here in AFI's 75th year. We are speechless champion #NeerajChopra#Tokyo2020#Athleticspic.twitter.com/w0WFmYTch7