Tokyo Olympic : जबरदस्त, शानदार!; भारताचा रवी कुमार दहिया सुवर्णपदकासाठी लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 02:57 PM2021-08-04T14:57:46+5:302021-08-04T15:20:30+5:30
Fourth medal assured for India : भारताच्या रवी कुमार दहियानं ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
Tokyo Olympic 2020 : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाचा उपांत्य फेरीचा सामना भारताचा रवी कुमार दहिया आणि कझाकिस्तानचा नुरीस्लॅम सानायेव्ह यांच्यात खेळवण्यात आला. ( Ravi Dahiya play the semifinal match against KAZ SANAYEV Nurislam) रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २-९ अशा पिछाडीवरून रवी कुमारनं शानदार कमबॅक करताना अंतिम फेरीत धडक दिली. भारताचे चौथे ऑलिम्पिक पदक निश्चित झाले आहे आणि आता रवी कुमारकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा लागल्या आहेत. २०१२नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे. ( Silver medal assured! Ravi Dahiya first Indian since Sushil in 2012 to enter the wrestling finals in Olympics)
What a bout! What a comeback! 😍
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
And Ravi Kumar Dahiya is through to the 57kg FINAL in men's #wrestling 🙌🙌🙌#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion
रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं २-१ अशी आघाडी घेतली होती. ( Ravi Dahiya leading 2-1 at end of 1st period). दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग ( मगर पकड) करत ८ गुण कमावले अन् ९-२ अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून ३ गुण घेत पिछाडी ५-९ अशी कमी केली. कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. अन Victory by fall नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले.
RAVI KUMAR PINS HIS OPPONENT DOWN! 😱🤩
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
With this move, #IND's 57kg representative in #wrestling made it to the gold-medal match!#StrongerTogether | #UnitedByEmotion | #Tokyo2020 | #Olympicspic.twitter.com/riJqnuwXn8
रवी कुमार दहियाने बल्गेरियाच्या १४-४ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी त्याने उपउपांत्यपूर्व लढतीत कोलंबियाच्या ओस्करचा १३-२ असा धुव्वा उडवला होता. पुरुषांच्या ८६ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या गटात दीपक पुनिया आणि चीनचा शेन यांच्यातील ही लढत रोमहर्षक झाली. या लढतीत दीपक पुनियाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र खेळाच्या मध्यावर चिनी कुस्तीपटूने जोरदार मुसंडी मारत ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र सामना संपण्यासाठी काही सेकंदांचा वेळ असताना दीपकने निर्णायक डाव खेळत २ गुण कमावले आणि विजय निश्चित केला.
That's how you finish in style! 😎
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
Second seed Deepak Punia gives #IND a semi-final entry in the men's 86kg freestyle wrestling! 🤼♂️#StrongerTogether | #Olympics | #Tokyo2020 | #BestOfTokyopic.twitter.com/lb44bPOfsy
𝙍𝙖𝙫𝙞 𝙠𝙖 𝙠𝙝𝙪𝙢𝙖𝙧 , #Tokyo2020 𝙢𝙚𝙞𝙣 𝙗𝙖𝙧𝙠𝙖𝙧𝙖𝙖𝙧 🤩🤩
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
Ravi Kumar enters the semi-final in the men's 57kg category in his debut #Olympics appearance! #StrongerTogether | #UnitedByEmotion | #BestOfTokyopic.twitter.com/6eKrpKnmss