Tokyo Olympic, Vinesh Phogat : विनेश फोगाटवर भारतीय कुस्ती महासंघाची निलंबनाची कारवाई, भारतीय खेळाडूंसोबत सरावास दिला होता नकार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:28 PM2021-08-10T18:28:35+5:302021-08-10T18:28:53+5:30
Tokyo Olympic 2020 : भारताची टॉप कुस्तीपटू विनेश फोगाट ( Vinesh Phogat) हिच्यावर गैरशिस्तीप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघानं ( WFI) तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली.
Tokyo Olympic 2020 : भारताची टॉप कुस्तीपटू विनेश फोगाट ( Vinesh Phogat) हिच्यावर गैरशिस्तीप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघानं ( WFI) तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली. शिवाय कुस्तीपटू सोनम मलिक हिलाही नोटीस बजावण्यात आली आहे. ( The Wrestling Federation of India (WFI) on Tuesday "temporarily suspended" star grappler Vinesh Phogat). टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तिला १६ ऑगस्टपर्यंत बाजू मांडण्याची संधी WFIने दिली आहे.
भारतासाठी पदक जिंकू शकणाऱ्या विनेश फोगाटचं गीता-बबिताशी असलेलं नातं माहीत आहे का?
हंगेरीवरून विनेश टोकियोत दाखल झाली. तिथे तिनं प्रशिक्षक वॉलर अॅकोस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. तिनं टोकियोत ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहण्यास आणि भारताच्या अन्य सदस्यांसोबत सराव करण्यास नकार दिला होता. शिवाय स्पर्धेदरम्यान तिनं भारतीय खेळाडूंसाठीच्या अधिकृत स्पॉन्सरचे कपडे न घालता NIKEचा लोगो असलेले कपडे घातले होते. ''ही गैरवर्तवणूक आहे. तिला तात्पुरते निलंबित करण्यात आहे आहे आणि त्यामुळे तिला कुस्तीपासून दूर रहावे लागेल. जोपर्यंत ती WFIकडे तिची बाजू मांडत नाही आणि महासंघाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत तिला आता राष्ट्रीय किंवा स्थानिक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही,''असे WFIच्या सूत्रांनी PTI ला सांगितले.
भारतीय ऑलिम्पिक समितीनेही ( IOA) WFIची कानउघडणी केली. कुस्तीपटूंच्या अशा गैरवर्तनावर अंकूश का लावता आला नाही, असा सवाल करत IOAनं कुस्ती महासंघाला नोटीस पाठवल्याचे, सुत्रांनी सांगितले. टोकियोत विनेशला भारतीय खेळाडू सोनम, अंशू मलिका आणि सीमा बिस्ला यांच्या शेजारील खोली देण्यात आली होती, त्यावरून विनेशनं गोंधळ घातला होता. हे सर्व खेळाडू भारतातून टोकियोत आलेले होते आणि त्यांच्यामुळे कोरोना होईल अशी भीती तिला वाटत होती, असे टोकियोत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. तिनं भारतीय खेळाडूंसोबत सरावासही नकार दिला होता.