Tokyo Olympic, Deepak Punia : अखेरच्या ३० सेकंदात सामना फिरला अन् दीपक पुनियाला कांस्य पदकानं हुलकावणी दिली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 05:02 PM2021-08-05T17:02:06+5:302021-08-05T17:07:38+5:30

Tokyo Olympic : रवी कुमार दहिया पाठोपाठ भारताचा कुस्तीपटू दीपक पुनिया याला पराभवाचा धक्का बसला. पण, दीपकला यावेळी कांस्यपदकानं हुलकावणी दिली.

Tokyo Olympic :  Deepak Punia (FS 86kg), lost in the final seconds of the bronze medal match in Tokyo 2020 | Tokyo Olympic, Deepak Punia : अखेरच्या ३० सेकंदात सामना फिरला अन् दीपक पुनियाला कांस्य पदकानं हुलकावणी दिली 

Tokyo Olympic, Deepak Punia : अखेरच्या ३० सेकंदात सामना फिरला अन् दीपक पुनियाला कांस्य पदकानं हुलकावणी दिली 

googlenewsNext

Tokyo Olympic : रवी कुमार दहिया पाठोपाठ भारताचा कुस्तीपटू दीपक पुनिया याला पराभवाचा धक्का बसला. दीपकला यावेळी कांस्यपदकानं हुलकावणी दिली. ८६ किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या दीपक पुनियानं २-१ अशी आघाडी घेतली होती. ( Deepak leading 2-1 at end of 1st period) सॅन मारिनोच्या अॅमिने मायलेस नाझेमला भारतीय खेळाडूनं कडवी टक्कर दिली. दोन्ही खेळाडू पहिल्या पाच मिनिटांत बचावात्मक खेळ करताना दिसले आणि त्यामुळे अखेरच्या ६० सेकंदात कमालीची उत्सुकता वाढली. अखेरच्या ३० सेकंदात सॅन मारिनोच्या खेळाडूनं दीपकचा पाय पकडून त्याला जमिनिवर गुडघे टेकण्यास भाग पाडत ३-२ अशी आघाडी घेतली. पण, भारतीय प्रशिक्षकांनी याविरोधात पंचांकडे दाद मागितली, त्यात पंचांनी निर्णय सॅन मारिनोच्या बाजूनं दिला. दीपकला हा सामना 2-4 असा गमवावा लागला.

उपांत्य फेरीत दीपक पुनियाकडून  अपेक्षा होत्या, परंतु अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर यानं पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करताना ९-० अशी भक्कम आघाडी घेतली आणि त्यानं १०-० असा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 

५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्ल रवी कुमार दहिया याला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली.  रवी कुमार आणि युगूएव्ह यांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ केला. रवीनं पकड करण्याचे प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूनं अपयशी ठरवले अन् पहिला गुणही घेतला. रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. 

रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. ( Ravi trailing 2-4 at end of 1st period). दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले. 
 

Web Title: Tokyo Olympic :  Deepak Punia (FS 86kg), lost in the final seconds of the bronze medal match in Tokyo 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.