Neeraj Chopra receives Padma Shri : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा पद्म श्री पुरस्काराने सन्मान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 07:37 PM2022-03-28T19:37:57+5:302022-03-28T19:41:11+5:30
नीरजनं टोकियोत भालाफेकीत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले आहे.
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचा ( Neeraj Chopra) आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म श्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नीरजनं टोकियोत भालाफेकीत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले आणि २००८नंतरचे भारताचे ऑलिम्पिक स्पर्धेतील हे पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. याहीपेक्षा १२५ वर्षांच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले.
Tokyo Olympic Gold medallist Neeraj Chopra receives Padma Shri from President Ram Nath Kovind pic.twitter.com/itZXyRUxbE
— ANI (@ANI) March 28, 2022
नीरज चोप्रानं टोक्योत भालाफेकीत ८७.५८ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम नीरजनं केला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नीरजमुळे मिळाले. २००८मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळेच नीरजवर बक्षिसांचा वर्षाव झाला. उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी नीरजला स्पेशल गाडी गिफ्ट केली आणि CSKनं १ कोटींसह त्याच्यासाठी बनवलेली खास जर्सी भेट म्हणून दिली.