Tokyo Olympic, Hockey : अम्पायरच्या चुकीमुळे भारत हरला?; बेल्जियमच्या विजयानंतर नवा वाद पेटला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 12:59 PM2021-08-03T12:59:44+5:302021-08-03T13:00:12+5:30

Tokyo Olympic, Hockey : १९८०नंतर पुन्हा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न मंगळवारी धुळीस मिळाले.

Tokyo Olympic, Hockey : Fans take it out on 'biased' umpiring after India loses to Belgium | Tokyo Olympic, Hockey : अम्पायरच्या चुकीमुळे भारत हरला?; बेल्जियमच्या विजयानंतर नवा वाद पेटला!

Tokyo Olympic, Hockey : अम्पायरच्या चुकीमुळे भारत हरला?; बेल्जियमच्या विजयानंतर नवा वाद पेटला!

Next

Tokyo Olympic, Hockey : १९८०नंतर पुन्हा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न मंगळवारी धुळीस मिळाले. वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमनं उपांत्य फेरीच्या सामन्यात ०-२ अशा पिछाडीवरून तुफान कमबॅक करताना ५-२ असा विजय मिळवला. शेवटच्या ११ मिनिटांमध्ये बेल्जियमनं ३ गोल करून हा विजय खेचून आणला. 

भारतीय संघाचे 'सुवर्ण'स्वप्न भंगले, तरीही ४१ वर्षांनी पदक जिंकण्याची आणखी एक संधी!

शेवटच्या ११ मिनिटांत बेल्जियमने जवळपास ६-७ पेनल्टी कॉर्नर आणि एक स्ट्रोक्स कमावला. त्यामुळे भारतावरील दडपण वाढले अन् बेल्जियमनं कमबॅक केले. बेल्जियमच्या हेंड्रीक्स अॅलेक्झांडरनं तीन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला जे डोहमेन व लूयपाएर्ट यांनी प्रत्येकी एक गोल करून उत्तम साथ दिली. भारताकडून मनप्रीत सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी गोल केले. भारताच्या या पराभवानंतर नेटिझन्सनी अम्पायरची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली. त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताचे सुवर्णस्वप्न भंगल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.

बघा नेटिझन्स काय म्हणतात?













Web Title: Tokyo Olympic, Hockey : Fans take it out on 'biased' umpiring after India loses to Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.