Tokyo Olympic, Hockey : भारतीय महिला हॉकी संघाची 'सुवर्ण' घोडदौड अर्जेंटिनानं रोखली; आता कांस्यसाठी लढणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:04 PM2021-08-04T17:04:17+5:302021-08-04T17:08:49+5:30
Tokyo Olympic, Hockey : पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत अपयश आल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या.
Tokyo Olympic, Hockey : पुरुष हॉकी संघाला उपांत्य फेरीत अपयश आल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. फिनिक्स भरारीप्रमाणे भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यांच्यासमोर बलाढ्य अर्जेंटिनाचे आव्हान होते, तरीही भारतीय महिला संघानं कडवी झुंज दिली. १९८० सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी चौथे स्थान पटकावले होते. त्यानंतरची ही महिला संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय महिला संघानं उपांत्य फेरीचा हा सामना गमावला असला तरी त्यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. ( Indian women's hockey team lose against Argentina in the semifinal match, to take on Great Britain in bronze medal clash)
राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं ३६ वर्षांनंतर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती आणि त्याच संघानं आता पाच वर्षांनी थेट उपांत्य फेरीत धडक देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ४१ वर्षांपूर्वी भारतीय महिला संघ चौथ्या स्थानावर राहिला होता आणि ती त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. पण, अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासमोर बलाढ्य अर्जेंटिनाचे आव्हान होते. अर्जेंटिनाच्या महिला संघाने सिडनी २००० आणि लंडन २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
Punjab: Family members of hockey player Gurjit Kaur in Ajnala hold the national flag as they cheer for team India playing Women's Hockey match against Argentina at Tokyo #OlympicGames
— ANI (@ANI) August 4, 2021
Gurjit Kaur scored the first goal for team India pic.twitter.com/MXL7Tdag4D
साखळी स्पर्धेतील अखेरच्या दोन सामन्यांनंतर भारतीय महिला संघाचा उंचावलेल्या आत्मविश्वासानं अर्जेंटिनालाही पहिल्या सत्रात बॅकफूटवर टाकले. दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गुरजीत सिंगनं गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. या गोलनं भारतीय खेळाडूंचे मनोबल आणखी उंचावले अन् त्यांनी अर्जेंटिनाचे आक्रमण यशस्वीरित्या थोपवून लावले. पहिल्या १५ मिनिटांत अर्जेंटिनाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले अन् गोलरक्षक सवितानं हे अयशस्वी ठरवले. भारतानं पहिल्या १५ मिनिटांत १-० अशी आघाडी कायम राखली. (India leading 1-0 at end of 1st quarter | Semis | Vs Argentina)
Tremendous strike by Gurjit Kaur. Scored 1st Goal. Very early lead. #Hockey#TeamIndia#Olympics
— Dharmvir Baundwal (@dharmvir_9) August 4, 2021
IND =1, ARG =0 pic.twitter.com/V8tEuxQVVB
दुसऱ्या सत्रात अर्जेंटिनानं आक्रमणाची धार अधिक तीव्र करताना भारताच्या डी सर्कलवर हल्लाबोल केला अन् १८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर त्यांना बरोबरी मिळवण्यात यश आलं. बारीओनेएव्होनं हा गोल केला. भारतीय खेळाडूंसाठी हा वेक अप कॉल होता. वंदना कटारियानं अर्जेंटिनाची बचावभींत भेदून चेंडू डी सर्कलपर्यंत नेला, परंतु त्याला अंतिम स्वरूप देता आले नाही. अर्जेंटिनाच्या महिलांकडूनही आक्रमक खेळ झाला. पण, गोलरक्षक सविता अभेद्य भींतीसारखी त्यांच्यासमोर उभी राहिली.
अर्जेंटिनाकडून सातत्यानं होत असलेले आक्रमण पाहून भारतीय संघाचे मनोबल जराही खचले नाही. सलिमा टेटेनं भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला, परंतु आघाडी घेता आली नाही. पुढच्याच मिनिटाला आणखी एक कॉर्नर मिळाला पण ताळमेळ चुकल्यानं ही पण संधी वाया गेली. भारतानं मध्यांतरापर्यंत १-१ अशी बरोबरी कायम राखली. ( Argentina threw everything at India in Q2 but the game is still level. 1-1 it is) तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनानं पेनल्टी कॉर्नवर गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. बारीओनेएव्होनं हा गोल केला. यानंतर भारतीय महिलांचे मनोबल खचलेले दिसले. त्या प्रयत्न करत होत्या, परंतु त्याला अंतिम स्वरूप देण्यात कमी पडत होत्या. तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनानं २-१ अशी आघाडी कायम राखली. ( India trailing 1-2 at end of 3rd quarter)
चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंकडून सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. सामना संपण्यास १० मिनिटांचा खेळ शिल्लक असताना भारताला बरोबरीचा गोल करण्यासाठी पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण, अर्जेंटिनाच्या गोली मारियानं तो हाणून पाडला. आता अर्जेंटिना चेंडूवर ताबा ठेऊन सावध खेळ करण्यातच आनंदी होता. भारतीय खेळाडूंना ते चेंडू मिळवूनच देत नव्हते. त्यामुळे भारतीय संघाला हार मानणे भाग पडले.