Tokyo Olympic : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं ज्यांना 'खाऊ' वाटतं, त्यांनी हा Video पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 06:45 PM2021-07-29T18:45:05+5:302021-07-29T18:45:28+5:30

Tokyo Olympic : टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे.

Tokyo Olympic : Level of competition in Olympic 2021 is astonishing, Watch Video | Tokyo Olympic : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं ज्यांना 'खाऊ' वाटतं, त्यांनी हा Video पाहाच!

Tokyo Olympic : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं ज्यांना 'खाऊ' वाटतं, त्यांनी हा Video पाहाच!

Next

Tokyo Olympic : टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, तिरंदाजी, नेमबादी, जिमनॅस्टीक्स आदी खेळांमध्ये तर मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू यंदा पहिल्या-दुसऱ्या फेरीत बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जागतिक नेमबाजी स्पर्धेत पदकांची लयलुट करणारे भारतीय नेमबाज ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर लगेच टीका होताना दिसत आहेत. वर्ल्ड कपमध्ये जिंकता मग इथे का नाही, असा प्रश्न करणारे मीम्स सोशल मीडियावर १९ वर्षीय मनू भाकेरच्या नावानं व्हायरल झाले आहेत. पण, ज्यांना असं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं 'खाऊ' आहे त्यांनी एकदा हा व्हिडीओ पाहाच.

Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का?

दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू हा तितक्याच ताकदिनं, अफाट इच्छाशक्ती आणि प्रबळ निर्धार घेऊन मैदानावर उतरतो. पदक जिंकण्याच्या ओझ्यासह कोट्यवधी देशवासीयांच्या अपेक्षांचे दडपणही त्यानं खांद्यावर घेतलेले असते. अशात एक चूकही महागात पडू शकते, हा सततचा दबाव त्याच्या मनात सुरू असतो. त्याक्षणी जो खेळाडू या दडपणाला झुगारून लावतो, तो बाजी मारतो.. पण, म्हणून आपले खेळाडू वाईटच खेळले असा अर्थ होत नाही. 

पाहा व्हिडीओ... 


मेरी कोमचा धक्कादायक पराभव, पण इतरांनी दाखवले पदकाचे स्वप्न...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष हॉकी संघानं अ गटातील सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला, तिरंदाजीत अतनू दासनं दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला हार मानण्यास भाग पाडले. पण, आजच्या दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला मोठा धक्का बसला. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरीला पराभवाचा धक्का बसला. ३८ वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीला कडवी टक्कर दिली, परंतु भारताच्या दिग्गज बॉक्सरचा प्रवास इथेच संपला.
 

Web Title: Tokyo Olympic : Level of competition in Olympic 2021 is astonishing, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.