Tokyo Olympic : ४५ घरांचं गाव, ना टीव्ही, ना इंटरनेट; सलिमा टेटे उद्या पदकासाठी मैदानात, पण कुटुंबीय तिला लाईव्ह नाही पाहू शकणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:31 PM2021-08-03T15:31:54+5:302021-08-03T15:33:27+5:30
Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघापाठोपाठ महिलांनीही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला
Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघापाठोपाठ महिलांनीही टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला. १९८०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहा संघांमध्ये भारतीय महिला संघ चौथ्या क्रमांकावर राहिला होत. तेव्हा उपांत्य फेरीचे सामने झाले नव्हते. ४१ वर्षांनी प्रथमच भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर अर्जेंटिनाचे आव्हान आहे. भारतीय महिला संघाचा हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक असताना या संघातील प्रमुख खेळाडू सलिमा टेटे ( Salima Tete) हिच्या कुटुंबीयांना व गावाकऱ्यांना हा सामना लाईव्ह पाहता येणार नाही. यापेक्षा टेटे कुटुंबीयांसाठी दुसरे दुर्भाग्य काही असूच शकत नाही.
Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या प्रविण जाधवच्या कुटुंबीयांना मिळतेय धमकी
झारखंडच्या बडकिचपार गावातल्या सलिमानं जगाच्या नकाशावर गावाचे नाव गाजवले. पण, ती ज्या गावात लहानाची मोठी झाली, ना तिथे कोणाच्या घरी टिव्ही आहे ना इंटरनेट कनेक्शन... ४५ कुटुंबायांच्या या गावात नेटवर्क म्हणजे ना च्या बरोबरच. त्यामुळे उद्या जेव्हा जग भारतीय महिला हॉकी संघाचा खेळ लाईव्ह पाहत असेल, तेव्हा सलिमाच्या घरच्यांना मात्र कुठून तरी निकाल कळेल, याची प्रतीक्षा पाहावी लागले.
सलिमाची बहिण महिमा टेटे ही पण राष्ट्रीय हॉकीपटू आहे. तिने सांगितले की,''गावातील प्रत्येकाला सलिमाला ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहायचे आहे, परंतु इंटरनेटचे पूअर कनेक्शनमुळे मोबाईलवरही हा सामना पाहता येणार नाही. आमच्या गावात फक्त ४५ कुटुंबीय आहेत आणि कोणाच्याही घरात टीव्ही नाही. इंटरनेट कनेक्शन सुरळीत नसल्यामुळे त्यांना मोबाईलवरही मॅच पाहता येत नाही. हे आमचे व गावकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणावं लागेल.''
इंटरनेट कनेक्शन मिळवण्यासाठी लोकांना इकडे-तिकडे हिंडावे लागते. त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यासाठी काहीतरी मदत मिळेल, अशी महिमाला अपेक्षा आहे.
Jharkhand: Family of Salima Tete -a member of the women's hockey team that will play in semis tomorrow at #Olympics- wish her the best
— ANI (@ANI) August 3, 2021
Her parents, at their residence in Badkichapara, Simdega say, "We're very happy, very proud of her. We hope that they come back with gold medal" pic.twitter.com/osMDwBTM6V
We are very happy, we are proud. We hope that they win the semi-finals too. We hope they come back with a gold medal. The entire village is very happy, we watch the matches together: Mahima, sister of Olympian hockey player Salima Tete#Olympicspic.twitter.com/wN5kpPSaON
— ANI (@ANI) August 3, 2021