Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : खुब लढा शेर!; रवी कुमार दहियाची सुवर्णपदकाच्या सामन्यात झाली हार, पण जिंकली मनं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:38 PM2021-08-05T16:38:03+5:302021-08-05T16:48:22+5:30
Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya gets Silver medal : ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्लाला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला.
Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya GOLD medal bout : नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय खेळाडूचा मान कुस्तीपटू रवी कुमार दहियाला पटकावण्यात अपयश आलं. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्लाला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचवे पदक आहे. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली. ( Ravi Kumar Dahiya gets Silver medal; gave his absolute best before going down fighting to 2 time reigning World Champion Zaur Uguev 4-7 in Final. Its 2nd Silver medal for India & 5th medal overall at Tokyo.)
Another medal for @WeAreTeamIndia!
— Olympics (@Olympics) August 5, 2021
Kumar Ravi of #IND takes #silver in the men's freestyle 57kg #Wrestling#StrongerTogether | @Tokyo2020 | @Wrestlingpic.twitter.com/7bNZ4jdfya
रवी कुमार आणि युगूएव्ह यांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ केला. रवीनं पकड करण्याचे प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूनं अपयशी ठरवले अन् पहिला गुणही घेतला. ( Ravi Kumar Dahiya vs Zavur Uguev of ROC in men's freestyle 57kg final) रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. ( Ravi trailing 2-4 at end of 1st period). दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले.
Ravi Kumar Dahiya gave it his all but couldn't get the better of #ROC's Zavur Uguev. He loses the final bout 4-7.
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 5, 2021
But he has won the #SILVER medal for #IND 🙌#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion
गुरुवारचा दिवस हा भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद खिळवणारा ठरला. ज्या भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिक सुवर्ण काळाबद्दल आपल्यापैकी अनेकांनी फक्त ऐकले होते, तो सुवर्णकाळ नव्यानं सुरू होताना आज सर्वांनी पाहिला. १९८० नंतर भारतीय पुरूष हॉकी संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक नावावर केले. भारतानं बलाढ्य जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवला. पण, या विजयानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या कामगिरीकडे. विनेशनं पहिला सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, परंतु त्यापलीकडे तिला जाता आले नाही. रिपीचेज राऊंडमधून संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, तिही मावळली.
One of Vinesh's points in her fighting loss to Vanesa Kaladzinskaya 👇
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 5, 2021
The #BLR wrestler bowed out in the semi-final, ending #IND's chances of a medal in #wrestling through repechage.#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | #Tokyo2020pic.twitter.com/AgzKJuFtcS
हॉकीनंतर भारतीयांना कोणत्या सामन्याची उत्सुकता होती, तर ही रवी कुमार दहिया याची... २०१२नंतर भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत पहिले पदक जिंकून देण्याचा मान रवी कुमारनं पटकावला. त्यानं उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव्ह नुरीस्लॅम याचा पराभव केला. यावेळी रडिचा डाव खेळत त्याने रवीच्या दंडावर चावा घेतला. त्याने घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरला.
रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सोनीपत येथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले. ''तो सुवर्णपदक जिंकेल, असा देशवासियांना विश्वास आहे. इथे सणासारखे वातावरण आहे,''असे रवीचे वडील राकेश दहिया यांनी सांगितले.
Haryana | Wrestler Ravi Kumar Dahiya's family members in Sonipat cheer for him ahead of his men's freestyle (57kg) final later today
— ANI (@ANI) August 5, 2021
"The country has faith that he'll win gold. There's a festive atmosphere here. He'll bring glory to country," says Rakesh Dahiya, Ravi's father pic.twitter.com/wCl4h0EB0o
रवी कुमार दहियाच्या यशामागे वडिलांचा वाटा!
आज रवी दहिया (Ravi Dahiya ) याच्या या यशामागे वडिलांचा दीर्घ संघर्ष आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीचे डावपेच शिकत असलेला आपला मुलगा कमकुवत पडू नये, म्हणून वडील राकेश दहिया हे रोज 70 किलोमीटरचा प्रवास करून त्याच्यासाठी दूध आणि लोणी घेऊन जात आणि त्याच्या सर्व गरजा पूर्ण करत. राकेश दहिया स्वतः एक पैलवान होते - राकेश दहिया हे स्वतःच एक पैलवान राहिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवावे असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.