Tokyo Olympic : टीम इंडियानं हॉकीत ऑलिम्पिक गोल्ड जिंकल्यास, पंजाबच्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी २.२५ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:16 PM2021-07-30T19:16:39+5:302021-07-30T19:17:28+5:30
Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघानं शुक्रवारी यजमान जपानला पराभूत करून अ गटात १२ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले.
Tokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघानं शुक्रवारी यजमान जपानला पराभूत करून अ गटात १२ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले. ४१ वर्षांनंतर टीम इंडियानं प्रथमच साखळी फेरीत चार विजय मिळवण्याचा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक केले आणि सलग तीन विजयांची नोंद केली. आजच्या अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी जपानवर ५-३ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय पुरुष संघ ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवणार अशा आशा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंगा सोढी यांनी मोठी घोषणा केली.
2️⃣ quick 2️⃣ handle!#IND’s Gurjant Singh struck twice in their 5-3 win over #JPN! 🙌#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Hockey | #BestOfTokyo | @TheHockeyIndiapic.twitter.com/iaUcZDkwfe
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 30, 2021
हॉकीत गोल्ड मेडल जिंकल्या, पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी देण्यात येणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री राणा गुरप्रीत सिंग यांनी केली. भारतीय संघात पंजाबच्या २० खेळाडूंचा समावेश आहे आणि त्यापैकी ११ खेळाडू मैदानावर दमदार कामगिरी करत आहेत. १९८०साली भारतीय पुरूष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये अखेरचं गोल्ड मेडल जिंकलं होतं. ( On winning Olympic gold, Punjab hockey players to get Rs 2.25 crore each: Sports Minister)
Well done @TheHockeyIndia. Solid if not spectacular 5-3 win over Japan. With this, India has 4 wins in our pool and finish Top 2. First time this has happened in 41 years. Now for the QF 🇮🇳🏑 #OLYMPICSpic.twitter.com/SwyIq72NCK
— Viren Rasquinha (@virenrasquinha) July 30, 2021
जपानविरुद्धच्या आजच्या सामन्यात पहिल्या सत्रात १३व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगनं पेनल्टी कॉर्नवर गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १७व्या मिनिटाला गुरजंत सिंगनं मैदानी गोल केला. जपानकडून १९व्या मिनिटाला पहिला गोल आला तो केंटो तनाकाच्या स्टीक्समधून. दुसऱ्या सामन्यात जपानकडून कोटा वॅटानाबेनं ( ३३ मि.) गोल करताना बरोबरीचा आनंद साजरा केला, परंतु तो पुढच्याच मिनिटाला मावळला. समशेर सिंगनं पुढच्याच मिनिटाला अप्रतिम मैदानी गोल करून भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.
५१व्या मिनिटाला निळकंट शर्मानं मैदानी गोल करून भारताची आघाडी ४-२ अशी मजबूत केली. त्यानंतर कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगच्या स्टीक्समधून आलेल्या चेंडूला गुरजंत सिंगन दिशा दाखवून ५-२ अशी दमदार आघाडी घेतली. गुरजंतचा हा सामन्यातील दुसरा गोल ठरला. ५९व्या मिनिटाला जपानकडून काजुमा मुराटानं गोल कडून पिछाडी ३-५ अशी कमी केली.