Tokyo Olympic : भारतीय पुरूष हॉकी संघातील पंजाबच्या खेळाडूंना सरकार देणार प्रत्येकी एक कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:02 PM2021-08-05T16:02:53+5:302021-08-05T16:03:24+5:30
Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले.
Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी बक्षीस देण्याचे पंजाबचे क्रीडा मंत्री राणा गुरमीत सिंग सोढी यांनी जाहीर केले.
Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास!
''या ऐतिहासिक क्षणी मला हे सांगण्यास आनंद होत आहे की भारतीय संघातील पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. आम्ही त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत,'' सोढी यांनी ट्विट केलं.
Immensely proud of our entire #IndianHockeyTeam performance in #Tokyo2020
— Rana Gurmit S Sodhi (@iranasodhi) August 5, 2021
It is time to enjoy & celebrate the historic #bronze
As Sports Minister of #Punjab it is my duty & matter of pride to promote, encourage the national sport & motivate flag-bearers@WeAreTeamIndia#Olympicshttps://t.co/WpzMfpT57K
कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह पंजाबचे आठ खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यामध्ये हरमनप्रीत सिंग, रुपिंदरपाल सिंग, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे. भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला, तेव्हा जर संघानं सुवर्णपदक जिंकल्यास पंजाबच्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ कोटी देण्याचे जाहीर केले होते.