मोठी बातमी : २० सेकंदामुळे हुकली गतविजेत्या मो फराहची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 12:04 PM2021-06-26T12:04:17+5:302021-06-26T12:04:39+5:30
ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदकं नावावर असलेला ब्रिटनचा धावपटू मो फराह ( Mo Farah) याला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता वेळ निश्चित करण्यात अपयश आलं.
ऑलिम्पिक स्पर्धेत चार सुवर्णपदकं नावावर असलेला ब्रिटनचा धावपटू मो फराह ( Mo Farah) याला टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता वेळ निश्चित करण्यात अपयश आलं. कारकीर्दितील अखेरचा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचे मो फराहचे स्वप्न २० सेकंदाच्या फरकानं हुकलं. मो फराहच्य ऑलिम्पिक पात्रतेसाठी ब्रिटिश चॅम्पियनशीपचे आयोजन केलं गेलं होतं, त्यानं ही स्पर्धी जिंकली. पण, १० किलोमीटर साठीची पात्रता वेळ २० सेकंदाच्या फरकानं हुकली.
मो फराहनं २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ५ हजार मीटर व १० हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यानं ही जेतेपदं कायम राखले. त्यानंतर त्यान मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली, परंतु त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या जुन्या इव्हेंटमध्ये परतला. ब्रिटिश १० हजार मीटर चॅम्पियनशीप स्पर्धेत फराहच्या पायाला दुखापत झाली होती. ५ जूनला झालेल्या या स्पर्धेतही त्याला ऑलिम्पिक पात्रता वेळ निश्चित करता आली नाही. ''मी इतक्या प्रदीर्घ काळ खेळत राहिलो, यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. त्यासाठी मी सर्वांचे आभारी आहे. ही खूप खडतर स्पर्धा होती. मी नेहमी सर्वोत्तम खेळाडूंना टक्कर देऊ शकत नाही.''
Not to be for @Mo_Farah tonight but this man is and always will be a champion
— Team GB (@TeamGB) June 25, 2021
🥇🥇🥇🥇 pic.twitter.com/CK3BnTSB9t
२९ वर्षीय फराहचा जन्म सोमिलाय येथे झाला, परंतु ८ वर्षांचा असताना तो इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. शालेयस्तरावर त्यानं धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सुरुवात केली. २००१मध्ये त्यानं ज्युनियर यूरोपियन चॅम्पियनशीपच्या ५००० मीटर स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. २००६मध्ये त्यानं यूरोपियन चॅम्पियनशीपमध्ये ५ हजार व १० हजार मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले. दोन्ही शर्यतीत सुवर्ण जिंकणारा तो इंग्लंडचा पहिला धावपटू ठरला.