BREAKING: टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट; ऑलिम्पिक व्हिलेजमधील एकाला लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 09:38 AM2021-07-17T09:38:49+5:302021-07-17T09:47:04+5:30
ऑलिम्पिक स्पर्धा एका आठवड्यावर आली असताना व्हिलेजमधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह
Next
टोकियो: टोकियो ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास आठवडा शिल्लक असताना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आयोजकांनी याबद्दल माहिती दिली आहे. टोकियोमध्ये २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल. ८ ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होईल.
First case of COVID19 detected in Tokyo Olympic Village, say organisers: AFP pic.twitter.com/JWvL4yGOrJ
— ANI (@ANI) July 17, 2021
ऑलिम्पिक व्हिलेजमधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती टोक्यो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशीरो मुटो यांनी दिली. खेळांच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गोपनीयतेचा हवाला देत त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीबद्दल माहिती दिली नाही. कोरोना महामारीचं संकट असल्यानं टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आलं. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. त्यांनी क्वारंटाईन होणं बंधनकारक आहे.