Tokyo Olympics: जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अदितीचे पदक थोडक्यात हुकले, चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 10:28 AM2021-08-07T10:28:46+5:302021-08-07T10:29:48+5:30

Tokyo Olympics Live Updates: टोकियो ऑलिम्पिकमधील महिलांच्या गोल्फमध्ये पहिल्या फेरीपासून पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या अदितीने पदकाची आस जागवली होती.  मात्र आज चौथ्या फेरीत कामगिरी खालावल्याने तिला पदकाने हुलकावणी दिली.

Tokyo Olympics: Golfer Aditi Ashok puts on a brilliant show, finishes 4th | Tokyo Olympics: जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अदितीचे पदक थोडक्यात हुकले, चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले

Tokyo Olympics: जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अदितीचे पदक थोडक्यात हुकले, चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले

Next

टोकियो - भारताची गोल्फपटू अदिती अशोकने टोकियो ऑलिम्पिकमध्ये  पदक जिंकून इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होती. मात्र पहिल्या तीन फेऱ्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या अदितीची चौथ्या फेरीतील कामगिरी काहीशी निराशाजनक झाली आणि तिला अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.  टोकियो ऑलिम्पिकमधील महिलांच्या गोल्फमध्ये पहिल्या फेरीपासून पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या अदितीने पदकाची आस जागवली होती.  मात्र आज चौथ्या फेरीत कामगिरी खालावल्याने तिला पदकाने हुलकावणी दिली.(Golfer Aditi Ashok puts on a brilliant show, finishes 4th)

२०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये अदिती अशोक ४१ व्या स्थानी राहिली होती. त्या स्पर्धेत खेळणारी ती सर्वात तरुण गोल्फपटू ठरली होती.  मात्र यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदितीने जबरदस्त कामगिरी केली. सुरुवातीपासूनच ती दिग्गज खेळाडूंना कडवी टक्कर देत होती. मात्र अखेरच्या क्षणी तिला न्यूझीलंडच्या लिडीया को हिचे आव्हान परतवता आले नाही.  

१९९८ मध्ये जन्मलेल्या अदितीने वयाच्या पाचव्या वर्षापासून खेळण्यास सुरुवात केली होती. तिने वयाच्या नवव्या वर्षी तिने राष्ट्रीय विजेतेपद जिंकले होते. तर २०१६ मध्ये तिने व्यावसायिक स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली होती. तसेच काही स्पर्धांमध्ये विजेतेपदही पटकावले होते. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने मिळवलेले यश हे लक्षवेधी ठरले आहे.  

दरम्यान, भारताची गोल्फर अदिती अशोकने तिसऱ्या फेरीतही आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत पदकाच्या आशा उंचावल्या होत्या. तिने तिसऱ्या फेरीत तीन अंडर ६७ स्कोअर करत दुसरे स्थान कायम राखले होते. विशेष म्हणजे, तिसऱ्या फेरीनंतर अदिती दुसऱ्या स्थानी एकटीच होती. या आधी ती दोन खेळाडूंसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी होती. अमेरिकेची नैली कोरडा अव्वल स्थानी असून, ती तीन स्ट्रोक्सने अदितीहून पुढे होती. तर न्यूझीलंडची लीडिया को, ऑस्ट्रेलियाची हॅन्ना ग्रीन, डेन्मार्कची ख्रिस्टिन पेडरसन आणि जपानची मोने इनामी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी होत्या. 

Web Title: Tokyo Olympics: Golfer Aditi Ashok puts on a brilliant show, finishes 4th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.