Tokyo Olympics: भारताच्या नीरज चोप्राची जबरदस्त कामगिरी, अव्वलस्थानासह गाठली भालाफेकीची अंतिम फेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:22 AM2021-08-04T08:22:14+5:302021-08-04T08:37:24+5:30
Tokyo Olympics Live Updates: अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.
टोकियो - टोकियोमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी दणक्यात झाली आहे. आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने जबरदस्त कामगिरी करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. मात्र भालाफेकीच्या पात्रता फेरीत ब गटात समावेश असलेल्या भारताच्या शिवपाल सिंह याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याची सर्वोत्तम भालाफेक ७६.४० मीटर राहिली, जी अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याच्या निकषापेक्षा खूप कमी होती.
.@Neeraj_chopra1 made entering an Olympic final look so easy! 😲😱
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
Neeraj's FIRST attempt of 86.65m in his FIRST-EVER #Olympics was recorded as the highest in men's Group A, beating @jojo_javelin's 85.64m 👏#StrongerTogether | #UnitedByEmotion | #Tokyo2020 | #BestOfTokyopic.twitter.com/U4eYHBVrjG
दरम्यान, पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्राचाच बोलबाला राहिला. नीरज चोप्रा ८६.६५ मीटर भालाफेकीसह अव्वलस्थानी राहिला. अ आणि ब गटातील कुठल्याही खेळाडूला त्याच्या कामगिरीची बरोबरी करता आली नाही. पात्रता फेरीत ८५.६४ मीटर अंतरासह जर्मनीचा वेटर जॉन्सन दुसऱ्या स्थानी राहिला. तर पाकिस्तानचा नदीम अर्शद ८५.१६ मीटर भालाफेकीसह तिसऱ्या स्थानी राहिला.
Tokyo Olympics: Javelin thrower Neeraj Chopra qualifies for men's final in first attempt
— ANI Digital (@ani_digital) August 4, 2021
Read @ANI Story | https://t.co/QErTSMHDKM#Tokyo2020#IndiaAtOlympics#JavelinThrowpic.twitter.com/YpwTTFpn4x
आघाडीच्या या तीन भालाफेकपटूंसह ब गटातून चेक प्रजासत्ताकचा जाकूब (८४.९३ मीटर), जर्मनीचा वेबर ज्युलिएन (८४.४१) तर अ गटातून फिनलंडचा इटालानियो लासी (८४.५० मीटर) भालाफेकीसह पात्रतेचा निकष पार करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
दरम्यान, भारताची भालाफेकपटू अनुराणी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. मंगळवारी ५४.०४ मीटर फेक करीत अनू अ गटात १४ व्या स्थानी राहिली.१४ खेळाडूंमध्ये अनूने ५०.३५ मीटरसह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नांत ५३.१९ मीटरचे अंतर गाठले.