Tokyo Olympic : 38 वर्षीय मेरी कोमचे सॉलिड पंच; 23 वर्षीय युवा प्रतिस्पर्धीची केली हालत खराब, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 06:00 PM2021-07-25T18:00:05+5:302021-07-25T18:00:44+5:30
Tokyo Olympics 2020: टेबल टेनिसपटू मनिका बात्राचा शानदार विजय, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची आगेकूच अन् बॉक्सर मेरी कोमचा विजयी पंच... हे वगळता भारताच्या वाटेला आज निराशाच आली
Tokyo Olympics: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आजचा दिवस हा भारतीयांसाठी काही खास राहिला नाही. टेबल टेनिसपटू मनिका बात्राचा शानदार विजय, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची आगेकूच अन् बॉक्सर मेरी कोमचा विजयी पंच... हे वगळता भारताच्या वाटेला आज निराशाच आली. हॉकीत पदकाचे स्वप्न पाहणाऱ्या पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाकडून 7-1 असा दारूण पराभव पत्करावा लागला. जलतरपणू श्रीहरी नटराज व माना पटेल यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आलं. ( Tokyo Olympics: Mary Kom storms into Round of 16)
बॉक्सर मेरी कोमनं 51 किलो वजनी गटात डॉमनिकन रिपब्लिकच्या मिग्यूएलिना गार्सियावर 4-1 असा सहज विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या दोन राऊंडनंतर गुणतालिका 19-19 अशी समसमान होती, परंतु त्यानंतर 38 वर्षीय मेरीनं सर्व अनुभव पणाला लावला अन् वयानं 15 वर्षांनी लहान असलेल्या प्रतिस्पर्धीला गार केले. मेरीनं 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.
पाहा व्हिडीओ...
Experience triumphing over youth! 🙌
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 25, 2021
38-year-old MC Mary Kom defeated her opponent 15 years younger than her, displaying supreme tactical awareness 👏🥊#StrongerTogether | #UnitedByEmotion | #BestOfTokyo | #Tokyo2020 | @MangteCpic.twitter.com/tVq5o75dh1
टेबलटेनिसपटू मनिका बात्रा हिनं दमदार पुनरागमन करताना मिळवलेला विजय हा लक्षवेधी ठरला. यूक्रेनच्या मार्गारिटा पेसोत्स्कानं पहिले दोन गेम सहज जिंकले. त्यामुळे मनिकाचे कमबॅक अशक्यच वाटत होते. मार्गारिटानं 11-4, 11-4 असा गेम जिंकून 2-0 अशी घेतलेली आघाडी मनिकाला मोठणे आव्हानात्मक होते, परंतु तिनं तिसऱ्या गेममध्ये 11-7 असा विजय मिळवत सामन्यातील चुरस वाढवली. चौथ्या गेममध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. 11 मिनिट चाललेल्या या गेममध्ये मनिकानं 12-10 अशा विजयासह सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
मनिकाचा हा कमबॅक पाहून युक्रेनची खेळाडू गोंधळली आणि चुकांमागे चुका करत गेली. पण, पाचवा गेम 11-8 असा घेत तिनंही आव्हान दिले. सहाव्या गेममध्ये मनिका 2-5 अशी पिछाडीवर होती आणि तिनं सलग 9 गुण घेत हा गेम 11-5 असा नावावर करून सामना 3-3 असा बरोबरीत आणल्या. सातव्या गेममध्ये मनिकानं 7 मिनिटांत युक्रेनच्या खेळाडूवर 11-7 असा विजय मिळवूत 4-3 अशी बाजी मारली.