Tokyo Olympics : संपूर्ण देशात मीराबाई चानूच्या नावाचाच डंका; जाणून घ्या, काय म्हणाले PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:18 PM2021-07-24T15:18:22+5:302021-07-24T15:24:19+5:30
Mirabai Chanu success in Tokyo olympics : मीराबाई चानूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने मेडल जिंकताच संपूर्ण देशात आंदाचे वातावरण आहे आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच बरोबर ऑलिम्पिक खेळाडूंकडून देशाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने आज झालेल्या 49 किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. (Tokyo olympics Mirabai Chanu success in olympics will inspire everyone PM Narendra Modi and president Ramnath Kovind congratulated)
मीराबाई चानूच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. मीराबाई चानूचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे, की ‘मीराबाई चानूच्या शानदार प्रदर्शनामुळे देशात उत्साहाचे वातावरण आहे. वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचे यश प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणा देईल.’
Could not have asked for a happier start to @Tokyo2020! India is elated by @mirabai_chanu’s stupendous performance. Congratulations to her for winning the Silver medal in weightlifting. Her success motivates every Indian. #Cheer4India#Tokyo2020pic.twitter.com/B6uJtDlaJo
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मीराबाई चानूचे अभिनंद करताना म्हटले आहे, वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकूण टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये भारतासाठी पदक तालिकेची सुरुवात केल्याबद्दल मीराबाई चानूचे हार्दिक अभिनंदन.
Heartiest congratulations to Mirabai Chanu for starting the medal tally for India in the Tokyo Olympics 2020 by winning silver medal in weightlifting.
— President of India (@rashtrapatibhvn) July 24, 2021
संघर्षाचं पदक -
मणिपूरच्या मीराबाईनं आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा.
...तेव्हा मनात आला होता वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचा विचार आता रचला इतिहास -
मीराबाईचं गाव इम्फाळपासून २२ किमी दूरवर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. कारण याकाळात ती नैराश्याचा सामना करत होती. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. पण नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागन केलं आणि आज टोकियोमध्ये इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी मीराबाई दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासोबतच वेटलिफ्टिंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं कांस्य पदकाची कमाई केली होती.