Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 07:22 AM2021-07-25T07:22:33+5:302021-07-25T07:23:18+5:30

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली.

Tokyo Olympics: Mirabai Chanu success will change mindset; The need to change social thinking | Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज 

Tokyo Olympics: मीराबाईच्या यशाने मानसिकता बदलेल; सामाजिक विचार बदलण्याची गरज 

Next

अयाज मेमन

कन्सल्टिंग एडिटर 

शनिवारची सकाळ मीराबाई चानूने गाजवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या भारोत्तोलकने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या यशाचे दोन महत्त्वपूर्ण पैलू आहेत. हे यश मिळवण्यासाठी तिने केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. अत्यंत गरीब घरातील सहा भावंडांमधील मीराबाईचे जीवन अत्यंत संघर्षमय ठरले. परिवाराचा आर्थिक भार उचलण्यासाठी तिला लहानपणी लाकडे तोडावी लागायची. मात्र, एका स्थानिक प्रशिक्षकाने तिच्यातील गुणवत्ता ओळखली आणि मीराबाईच्या आयुष्याला वेगळेच वळण लागले. त्यावेळी, ती केवळ १२ वर्षांची होती.

२०१४ साली ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकत मीराबाईने पहिल्यांदा सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून भारताला पदकाची सर्वाधिक आशा होती. मात्र, तिच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली. या अपयशाने अत्यंत निराश झालेल्या मीराबाईने खेळातून निवृत्त होण्याचाही विचार केला होता. या पराभवानंतर पुन्हा एकदा तिची कारकिर्द वेगळ्या वळणावर आली. रिओमधील अपयश टोकियोमध्ये मागे टाकण्याचा त्याचवेळी मीराबाईने निर्धार केला आणि पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तिने तेव्हाच सुरुवात केली.

स्नॅच विभाग मीराबाईची कमजोरी होती. मात्र, तिने ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे लक्ष्य समोर ठेवून कठोर मेहनत घेतली आणि ही कमजोरी दूर केली. टीव्ही समालोचनादरम्यान माजी हॉकी कर्णधार विरेन रिस्किन्हा यानेही सांगितले होते की, ‘कमजोरी दूर करणे हेच मीराबाईचे समर्पण ठरेल.’ शनिवारी स्पर्धेदरम्यान मीराबाई खूप सकारात्मक दिसली. स्नॅच प्रकारात प्रयत्न केल्यानंतर तिचा आत्मविश्वास आणखी वाढला. तिने आपल्या भावनांवर प्रचंड नियंत्रण राखले. माझ्या मते जर मुलींना आक्रमकतेने खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले, तेव्हाच असे परिवर्तन शक्य आहे. यासाठी सामाजिक विचार बदलण्याची गरज आहे. असे झाले तरच चानूसारखे चॅम्पियन दुर्मिळपणे नाही, तर नियमितपणे तयार होतील.

ऑलिम्पिकमधील भारताच्या आतापर्यंतच्या यशावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, ज्या खेळांमध्ये भारतीयांना तंदुरुस्त मानले जात नाही, त्याच खेळांमध्ये भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. मेरीकोम, कर्णम मल्लेश्वरी,  पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक अशी काही उदाहरणे आहेत. लिएंडर पेसने अटलांटामध्ये कांस्यपदक जिंकले आणि त्यानंतर २५ वर्षांत भारतीयांनी १५ वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यामध्ये सहा म्हणजेच ४० टक्के यश महिलांनी मिळवले आहे. मल्लेश्वरी, सायना नेहवाल, मेरी कोम, सिंधू, ंसाक्षी मलिक आणि मीराबाई चानू यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच, ऑलिम्पिकव्यतिरिक्त अनेक आघाडीच्या महिला खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. 

Web Title: Tokyo Olympics: Mirabai Chanu success will change mindset; The need to change social thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.