Tokyo Olympics: ॲथलेटिक्समध्ये ही भारतासाठी नवी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:10 AM2021-08-08T05:10:59+5:302021-08-08T05:11:55+5:30

भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते.

Tokyo Olympics new beginning for India in athletics | Tokyo Olympics: ॲथलेटिक्समध्ये ही भारतासाठी नवी सुरुवात

Tokyo Olympics: ॲथलेटिक्समध्ये ही भारतासाठी नवी सुरुवात

Next

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर

भारताची ऑलिम्पिकमध्ये सुरूवात शानदार झाली. मीराबाई चानू हीने रौप्य पदक मिळ‌वून दिले. मात्र ऑलिम्पिकचा शेवट हा त्यापेक्षा उत्तम झाला. पहिल्यांदाच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये सुवर्ण पदक पटकावले. हा ऐतिहासिक दिवस आहे. या आधी अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक मिळ‌वले होते. मात्र भारत नेहमीच ट्रॅक ॲण्ड फिल्डमध्ये मागे राहत होता. यामुळे भारतातील ॲथलेटिक्सला वेगळीच गती मिळू शकते. भाला फेकीच्या उपांत्य फेरीत तो पहिल्याच प्रयत्न करून परत गेला होता. त्याचा आत्मविश्वास होता. अंतिम फेरीतही त्याने पहिल्या दोन प्रयत्नात आपल्या आत्मविश्वासाचे प्रर्दर्शन केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव वाढला. त्यामुळे त्याला कुणीही पकड़ु शकले नाहीत. 

टोकियोत उकाडा खुप असतो. त्यामुळे जे खेळाडू ९० मीटरपेक्षा जास्त भालाफेक करतात. ते ८५ मीटरच्या आत फेक करत होते. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे कौतुक करावे लागेल. नीरज हा ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे. आशियाई पदक विजेता, राष्ट्रकुल पदक विजेता आहे. त्याच्या क्षमतेनुसार त्याने पुर्ण खेळ केला. त्याचे प्रशिक्षक, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि ॲथलेटिक्स संघटनेचेही कौतुक आहे. आजचा दिवस चागंला होता. त्यासोबतच बजरंग पुनियाने कांस्यपदक मिळवले.

अदिती अशोक ही देखील अखेरच्या स्ट्रोकवर चौथ्या स्थानावर राहिली ती रँकिंगमध्ये २०० व्या स्थानावर आहे. तेथून ती पुढे आली आहे. भारताने लंडन ऑलिम्पिकपेक्षा चांगली कामगिरी केली. लंडनमध्ये सहा पदके होती आता सात आहेत. आणि त्यातही एक सुवर्ण पदक आहे. हे सांगते की खुप जास्त प्रगती आहे. कारण रियोत फक्त दोन पदके होते. त्यामुळे ऑलिम्पिक खेळांत भारत पुढे जाऊ शकत नाही, असे वाटत होते. यंदा १२ ते १५ पदकांची अपेक्षा होती मात्र सात मिळाले आहेत. भारतासाठी क्रिकेट हा पॅशन असेल तर हॉकी हा इमोशन आहे. हे पदक ४१ वर्षांनी मिळाले आहे. महिलांच्या गटात देखील खुपच कडवी टक्कर होती. रियोत २०१६ मध्ये भारताने ४१ वर्षांनी पात्रता मिळवली होती. त्यानंतर असा खेळ करणे हे सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा हॉकीच्या विकासाला  वेग येईल.

Web Title: Tokyo Olympics new beginning for India in athletics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.