Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकचा समारोप; पुढील स्पर्धा तीन वर्षांनी पॅरिसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:54 AM2021-08-09T05:54:12+5:302021-08-09T05:54:20+5:30
पुढे जाण्याचा संदेश, भारत ४७व्या स्थानी
टोकियो : कोविड १९ व्हायरस आणि जवळ येत असलेल्या वादळातच असाधारण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा रविवारी समारोप करण्यात आला. त्यात आशा आणि दृढतेचे अभूतपूर्व प्रदर्शन करण्यात आले. जपानच्या राजधानीत शानदार आतशबाजीदेखील यावेळी करण्यात आली.
यावेळी कोविड १९ महामारीत ज्यांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ऑलिम्पिक ध्वज पॅरीसला सोपवण्यात आला. तेथे पुढील तीन वर्षांनी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीने टोकियोतील ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी यावेळी म्हटले की, सर्व खेळाडू पुढे जात आहेत. तसेच सर्व एकजूट होऊन उभे आहेत. तुम्ही महामारीत ज्या परिस्थितीचा सामना केला. ते कोणत्याही प्रदर्शनापेक्षा जास्त उल्लेखनीय आहे.’
जापनचा ध्वज ६८ हजार दर्शक क्षमतेच्या स्टेडिअममध्ये डौलात फडकवण्यात आला. मात्र प्रेक्षकांची उपस्थिती कमी होती. यावेळी अनेक खेळाडू तेथे उपस्थित होते. यावेळी टोकियोच्या गर्वर्नर युरिको कोईके यांनी ऑलिम्पिक ध्वज हा बाक यांना सोपवला तर त्यांनी तो पॅरीसच्या महापौर एने हिडाल्गो यांना दिला. यावेळी जापानचे क्राऊन प्रिन्स अकिशिनो, टोकियो ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष सेको हाशिमोटो उपस्थित होते.
पदक तालिका
क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१ अमेरिका ३९ ४१ ३३ ११३
२ चीन ३८ ३२ १८ ८८
३ जपान २७ १४ १७ ५८
४ ब्रिटन २२ २१ २२ ६५
५ रशिया २० २८ २३ ७१
६ ऑस्ट्रेलिया १७ ०७ २२ ४६
७ नेदरलॅंड १० १२ १४ ३६
८ फ्रान्स १० १२ ११ ३३
९ जर्मनी १० ११ १६ ३७
१० इटली १० १० २० ४०
४७ भारत ०१ ०२ ०४ ०७