Tokyo Paralympics: चीनला नमविले! नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:14 AM2021-08-30T08:14:54+5:302021-08-30T08:30:28+5:30

Avani Lekhara wins Gold Medal : अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 21 नेमबाजांनी भाग घेतला होता. यामध्ये सातव्या स्थानावर असलेल्या अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला.

Tokyo Paralympics: India's Avani Lekhara wins Gold Medal in women's 10m AR Standing SH1 Final  | Tokyo Paralympics: चीनला नमविले! नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध

Tokyo Paralympics: चीनला नमविले! नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध

googlenewsNext

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. महत्वाचे म्हणजे पॅरालिम्पकच्या इतिहासात भारतला शूटिंगमध्ये मिळालेले हे पहिले सुवर्ण पदक आहे. तिने 249.6 चा स्कोअर बनविला आहे. अवनी ही जयपूरची आहे. (Tokyo Paralympics: India's Avani Lekhara wins Gold Medal in women's 10m AR Standing SH1 Final )



 

अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 21 नेमबाजांनी भाग घेतला होता. यामध्ये सातव्या स्थानावर असलेल्या अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला. तिने 60 सीरीजच्या सहा शॉटमध्ये 621.7 स्कोअर बनविला. यामुळे तिला पहिल्या आठमध्ये जागा मिळाली. चीनची झांग कुइपिंग आणि यूक्रेनॉची इरियाना शेतनिक 626.0 स्कोअर केला होता. 

भारताला मिळालेली पदके....
रविवारी भाविनाबेन पटेलने महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत क्लास 4 मध्ये आणि निषाद कुमारने पुरुषांच्या टी 47 उंच उडी स्पर्धेत रौप्य दक पटकावले. तसेच थाळीफेकमध्ये विनोद कुमारने रविवारी कांस्य पदक पटकावले होते. मात्र, त्याच्या अपंगत्वाच्या प्रकारावर आक्षेप घेतल्याने त्याला याचा आनंद साजरा करता आला नव्हता. यामुळे पदक समारंभ 30 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. 

Web Title: Tokyo Paralympics: India's Avani Lekhara wins Gold Medal in women's 10m AR Standing SH1 Final 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.