Tokyo Paralympics : भावा खतरनाक परफॉर्मन्स!; ऑलिम्पिक चॅम्पियन नीरजकडून गोल्डन बॉय सुमितचे कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 05:33 PM2021-08-30T17:33:16+5:302021-08-30T17:34:36+5:30
Sumit Antil 𝐬𝐦𝐚𝐬𝐡𝐞𝐬 the World Record THRICE to secure theFirst place medalin Men's Javelin Throw F64 Final मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक,तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले.
मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक,तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले. नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्णपदकानं आजच्या दिवसाची सुरुवात झाली. यानंतर लगेचच थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाकडून रौप्य, भालाफेकपटू देवेंद्र झाजरिया रौप्य, सुंदर सिंगकडून कांस्य पदक पटकावण्यात आले. सायंकाळच्या सत्रात सुमित अंतिलनं ( Sumit Antil) सुवर्णवेध घेतला. त्यानं पाच प्रयत्नात तीन वेळा वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करताना ही सुवर्ण कामगिरी केली. ( Sumit Antil 𝐬𝐦𝐚𝐬𝐡𝐞𝐬 the World Record THRICE to secure theFirst place medalin Men's Javelin Throw F64 Final) या पदकानंतर टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने ( Neeraj Chopra) त्याचे कौतुक केले. नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. ''ख़तरनाक performance भाई सुमित proud of you ( खतरनाक कामगिरी भावा, तुझा अभिमान वाटतो.), "असे नीरजनं ट्विट केलं.
ख़तरनाक performance भाई सुमित 👌💪 proud of you 🇮🇳 https://t.co/CNUDDtPAc7
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 30, 2021
भालाफेकपटू सुमितनं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रिकॉर्ड नावावर केला. तिसऱ्या प्रयत्नात सुमितनं ६५.२७ मीटर भालाफेक केली. त्यानं पाचव्या प्रयत्नात पुन्हा ६८.५५ मीटर लांब भालाफेकून पुन्हा स्वतःचाच वर्ल्ड रिकॉर्ड मोडला. या कामगिरीसह त्यानं सुवर्णपदकही नावावर केलं.
#SumitAntil is the Champion, World Record Holder, #Tokyo2020#Paralympics 🥇 #Gold Medallist #Javelin@ParaAthletics
— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 30, 2021
Cheer4India #Praise4Para@narendramodi@ianuragthakur@IndiaSports@Media_SAI@ddsportschannel@TheLICForever@VedantaLimited@neerajkjha@EurosportINpic.twitter.com/jWoM36Bj0l
योगेश्वर दत्तला आदर्शस्थानी ठेवताना सुमितलाही कुस्तीपटू बनायचे होते. पण, २०१५मध्ये एका रस्ता अपघातात ट्रॅक्टर त्याच्या पायावरून गेला अन् त्याला एक पाय गमवावा लागला. ६ जून १९९० मध्ये त्याचा जन्म झाला. २००५ मध्ये मोटरबाईक अपघातात त्याचा पाय गेला. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक नवल सिंग यांच्या सांगण्यावरून त्यानं भालाफेकीला सुरूवात केली. २०१८मध्ये त्यानं आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला, परंतु तेव्हा तो पाचव्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर २०१९मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं रौप्यपदक जिंकून टोक्यो पॅरालिम्पिकची पात्रता निश्चित केली.