Tokyo Paralympics: जिद्दीला डबल गोल्ड; पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक, नेमबाजीत भारताला सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 06:53 AM2021-08-31T06:53:14+5:302021-08-31T06:54:02+5:30
देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला.
टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी भारतीय खेळाडूंनी धमाल केली. दोन सुवर्णांसह पाच पदके जिंकली. अवनी लेखराने नेमबाजीत तर सुमित अंतिलने भालाफेकीत सुवर्ण जिंकून दिले. याशिवाय देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला.
अपंगत्वावर मात
११ वर्षांची असताना अवनीचा कार अपघातात पाठीचा कणा मोडला. ती आयुष्यभरासाठी व्हिलचेअरवर आली. पण, तिनं या अंपगत्वाला स्वप्नांच्या आड येऊ दिले नाही.
सोमवारचे पदक विजेते
सुमित अंतिल : भालाफेक | सुवर्ण
अवनी लेखरा : नेमबाजी | सुवर्ण
देवेंद्र झझारिया : भालाफेक | रौप्य
योगेश कथुनिया : थाळीफोक | रौप्य
सुंदरसिंग गुर्जर : भालाफेक | कांस्य
सुमितने एफ ६४ प्रकारात विश्वविक्रमाची नोंद करीत ६८.५५ मीटर भालाफेक करीत सुवर्णावर नाव कोरले.
२०१५मध्ये एका रस्ता अपघातात ट्रॅक्टर त्याच्या पायावरून गेला अन् त्याला एक पाय गमवावा लागला. कुस्तीपटू बनायचे स्वप्न धुळीस मिळाले. पण त्याने हार मानली नाही.