उत्कर्षने झुंजविले आॅलिम्पियन तोमरला

By admin | Published: October 25, 2016 01:38 AM2016-10-25T01:38:30+5:302016-10-25T01:38:30+5:30

महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळेने ६१ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या फ्रिस्टाईल गटात रिओ आॅलिम्पियन संदीप तोमरला तगडे आव्हान देत नाकीनऊ

Toledo hit the Olympian Tomar | उत्कर्षने झुंजविले आॅलिम्पियन तोमरला

उत्कर्षने झुंजविले आॅलिम्पियन तोमरला

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या उत्कर्ष काळेने ६१ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरूषांच्या फ्रिस्टाईल गटात रिओ आॅलिम्पियन संदीप तोमरला तगडे आव्हान देत नाकीनऊ आणले, पण शेवटी त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे महाराष्ट्राच्या विक्रम कुऱ्हाडेने तब्बल १४ वर्षानंतर ग्रीको-रोमन प्रकारात राज्याला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले. महिला गटात रेश्मा मानेने व सोनाली तोडकरने आपआपल्या वजन गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.
गोंडा (उत्तर प्रदेश) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आज रेल्वेकडून खेळणारा महाराष्ट्राचा मल्ल उत्कर्ष काळेने आपल्या कामगिरीने संपूर्ण स्टेडियम डोक्यावर घेतले. त्याने रियो आॅलिम्पिकपटू तोमरला इतके झुंजविले की उत्कर्षच्या प्रत्येक डावावर प्रेक्षक टाळ्यांचा गजर करीत होते. तोमरने उत्कर्षविरूध्द झटापटी करीत ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात गुण संपादन केले. तोमरने उत्कर्षला ५-४ गुणांनी पराभूत केले.
तत्पूर्वी, दिवसातील सर्वात रोमहर्षक लढत लंडन आॅलिम्पियन अमित कुमार आणि उत्कर्ष काळे यांच्यादरम्यान झाली. या उपांत्य फेरीत काळेने अनुभवी अमितला धूळ चारत खळबळ उडवून देत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे रेल्वेच्या विक्रम कुऱ्हाडेने ग्रीको रोमन प्रकारात ५९ वजन गटात हरियाणाच्या रविंदरला अटीतटीच्या लढतीत ५-० गुणांनी धुव्वा उडवित सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी २००१ मध्ये महाराष्ट्राच्या रवींद्र पाटीलने सुवर्णपदक जिंकले होते. महिला गटात महाराष्ट्राच्या रेश्मा माने हिने ६३ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. महिलांच्या ५८ किलो वजन गटात हरियाणाच्या मंजूने महाराष्ट्राच्या सोनाली तोडकरला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले.

Web Title: Toledo hit the Olympian Tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.