टॉटनहॅमचा उपांत्य सामन्यात सलग आठव्यांदा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:06 AM2018-04-23T00:06:01+5:302018-04-23T00:06:01+5:30
मँचेस्टर युनायटेडची अंतिम फेरीत धडक
बलाढ्य मँचेस्टर युनायडेटने आपल्या लौकिकानुसार शानदार खेळ करत, टॉटनहॅमचा २-१ असा निर्णायक पराभव करून, एफए कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या शानदार विजयासह मँचेस्ट युनायटेड संघाने तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा मिळविली आहे. वेम्बली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना मँचेस्टर युनायटेडने बाजी मारली. विशेष म्हणजे, एफए चषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात टॉटनहॅमचा हा सलग आठवा पराभव ठरला. यासह टॉटनहॅमचे प्रशिक्षक मोरिसियो पोचेटिनी यांच्या पहिल्या चषकांची प्रतीक्षाही लांबली. गेल्या वर्षीही टॉटनहॅमला उपांत्य सामन्यात चेल्सीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, उपांत्य सामन्यात डेले अली याने शानदार गोल नोंदवत, टॉटनहॅमला आघाडी मिळवून दिली होती.
या वेळी त्यांना अंतिम फेरी गाठण्याची चांगली संधी चालून आली होती. मात्र, २४व्या मिनिटाला अॅलेक्सिस सांचेज याने मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधून देत सामन्यात रंग भरले. मध्यंतराला सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर, दुसºया सत्रात एंडर हरेरा याने निर्णायक गोल करत, मँचेस्टर युनायटेडचा विजय निश्चित केला.