आॅलिम्पिक दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा

By admin | Published: July 4, 2017 01:34 AM2017-07-04T01:34:24+5:302017-07-04T01:34:24+5:30

कॅनडा येथे होणाऱ्या जागतिक सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम सहभागी होणाऱ्या भारताच्या पुरूष संघास सोमवारी केंद्रिय क्रीडामंत्री विजय गोयल

This tour is important because of the Olympic | आॅलिम्पिक दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा

आॅलिम्पिक दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा

Next

नवी दिल्ली : कॅनडा येथे होणाऱ्या जागतिक सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम सहभागी होणाऱ्या भारताच्या पुरूष संघास सोमवारी केंद्रिय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सराव शिबिरात जाऊन शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा ७ ते १६ जुलै दरम्यान होणार आहे.
क्रीडा प्रेमीं गोयल यांनी आपल्या फेसबुक वरुनही प्रथमच
विश्वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय संघाला स्वत: शुभेच्छा देवुन खेळाडू, प्रशिक्षक यांचा उत्साह वाढविला. १७ खेळाडूंच्या संघात महाराष्ट्रातील ३ खेळाडूंचा सहभाग आहे हे महत्वाचे.

संघ पुढीलप्रमाणे :
प्रणव दंडादे, पियूष अंबुलकर (दोघे महाराष्ट्र), सुबोध चौरसिया, प्रवीण दवे (दोघे मध्यप्रदेश ), हरसिमरत सिंह सेहगल, ध्रुव दत्ता (दोघे दिल्ली ), किशन महानंद, सुनील राज , दीपक कुमार, हितेश कुमार (सर्व छत्तीसगढ़ ), साहिल गोयल, जगविंदर सिंह (दोघे पंजाब ), अजमल असरफ, विनीत आचार्यान (दोघे केरळ ), सुमित शर्मा (चंडीगढ़ ), जगदीश मंगला ( आंध्रप्रदेश ), चिराग सागवान ( हरियाणा );
मुख्य व्यवस्थापक : प्रविण अनावकर (इंदौर), व्यवस्थापक : आर. एल. मौर्य (दिल्ली), प्रशिक्षक : सिकंदर कुरील ( मध्यप्रदेश ), चेतन महाडिक (महाराष्ट्र ), प्रदीप कुमार (छत्तीसगढ़ )

आगामी टोकियो आॅलिम्पिकच्या दृष्टीने हा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जागतिक स्पर्धेत अव्वल संघ सहभागी होत आहेत. त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. - चेतन महाडिक

Web Title: This tour is important because of the Olympic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.