सिंधूने फडकावला गोल्ड कोस्टमध्ये तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 05:42 PM2018-04-04T17:42:34+5:302018-04-04T17:42:34+5:30
जेव्हा तिंरगा फडकावत भारताची पी.व्ही.सिंधू दाखल झाली तेव्हा स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पथक कधी येते, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. जेव्हा तिंरगा फडकावत भारताची पी.व्ही.सिंधू दाखल झाली तेव्हा स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्याला काही मिनिटांपूर्वी सुरुवात झाली. या स्पर्धेत 71 देश सहभागी झाले आहेत. त्यामुळे 71 देशांच्या पथकाने या सोहळ्याची रंगत वाढवली.
भारताकडून ध्वजवाहकाचा मान सिंधूला देण्यात आला होता. सध्याच्या घडीला ती भारतातील अव्वल बॅडमिंटनपटू आहे. त्यामुळे तिच्याकडून यावेळी सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे. सिंधू ध्वज वाहत असताना भारतीय पथकातील खेळाडूंनी चाहत्यांना नमस्कार करत साऱ्यांची मने जिंकून घेतली.
#TeamIndia walked into the #CarraraStadium led by @Pvsindhu1#StayTuned to watch more from the #GC2018@afiindia@BAI_Media@BFI_basketball@BFI_official@OfficialCFI@TheHockeyIndia@OfficialNRAI@indiasquash@ttfitweet@WeightliftingIN@FederationWrest@ParalympicIndiapic.twitter.com/JMSA4n92Xg
— IOA - Team India (@ioaindia) April 4, 2018