आदिती सिन्हाचा ट्रिपल धमाका

By admin | Published: September 22, 2016 03:59 AM2016-09-22T03:59:38+5:302016-09-22T03:59:38+5:30

आदिती सिन्हाने सब ज्युनियर, ज्युनियर आणि युवा गटात शानदार विजेतेपद पटकावत मुंबई उपनगर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत तिहेरी विजेतेपद पटकावले

Triple Explosion of Aditi Sinha | आदिती सिन्हाचा ट्रिपल धमाका

आदिती सिन्हाचा ट्रिपल धमाका

Next


मुंबई : आदिती सिन्हाने सब ज्युनियर, ज्युनियर आणि युवा गटात शानदार विजेतेपद पटकावत मुंबई उपनगर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत तिहेरी विजेतेपद पटकावले. तर मुलांमध्ये देव श्रॉफने सब ज्युनियर व ज्युनियर गटात बाजी मारत दुहेरी मुकुट मिळवला.
जुहू पार्ले जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत सब ज्युनियर गटात मिहिका रोहिराने आदितीला कडवी टक्कर देत २-२ अशी बरोबरी साधली. मात्र सलग दोन गेम जिंकताना आदितीने ७-११, ११-९, ४-११, ११-५, ११-६, ११-४ असा विजय मिळवला. ज्युनियर गटातही आदितीने मिहिकाचा ११-८, १२-१०, ११-९, ११-९ असा धुव्वा उडवत बाजी मारली. तर हाच धडाका युवा गटात कायम राखताना आदितीने द्युती पत्कीचे तगडे आव्हान ११-८, ११-६, ११-१३, ११-९, ७-११, ५-११, ११-४ असे परतावले.
मुलांमध्ये देव श्रॉफने लौकिकानुसार सब ज्युनियर गटात मानव मेहतावर ११-८, ११-५, ६-११, ११-४, ११-८ अशी मात करून बाजी मारली. तर ज्युनियर गटात आक्रमक खेळाच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवताना शिवम दासचा ११-५, ११-७, ११-१३, ११-६ असा पाडाव केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Triple Explosion of Aditi Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.